Crime News  Google
महाराष्ट्र

Aurangabad Crime News : वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूरात गोळीबार; युवक जखमी

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Aurangabad Crime News : बहिणीच्या प्रकरणात सुरू असलेल्या खटल्यात व्यवस्थित साक्ष न दिल्याच्या कारणावरून एकावर गावठी कट्ट्यातुन गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाळूज (valuj) औद्योगिक परिसरातील कमळापूर येथे घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. (Aurangabad Latest Marathi News)

या गोळीबारात कमळापूर येथील सागर सुभाष सदार हा युवक जखमी झाला आहे.‌ संशियत आरोपीच्या बहीणचे एका व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. वर्षांपूर्वी बहिणीनं आत्महत्या केली. त्यानंतर पाेलीसांनी (police) अनैतिक संबंध असलेल्या व्यक्तीला अटक केली.

परंतू मित्रानं चुकीची साक्ष दिल्याने संबंधित व्यक्ती सुटला होता. सागर हा त्या व्यक्तीशी बोलत होता हे गाेळीबार करणा-या संशयित आराेपीला आवडत नसे. तो सागरला त्याच्याशी बाेलून नकाे असे सांगत असे. (Maharashtra News)

परंतु सागर यांनी ऐकले नाही. या कारणावरून गाेळीबार करणा-याचे त्याच्याशी भांडण झाले. त्याने त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्याने सागरला जखमी केले. तसेच एकाने तलवारीने व लाथाबुक्यांनी सागरला मारहाण केली. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ₹५०००; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

SCROLL FOR NEXT