fire, yavatmal , nashik, diwali  saam tv
महाराष्ट्र

Fire News : लक्ष्मीपूजनानंतर यवतमाळ, नाशकात आग; लाखाेंचे नुकसान

गेल्या दाेन दिवसांत आग लागण्याचे घटना घडत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड, तबरेज शेख

Fire News : राज्यभरात दिवाळी (diwali) माेठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. साेमवारी रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपूजना (lakshmi pujan 2022) निमित्त राज्यातील विविध जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये फटाके फाेडण्यात येत हाेते. त्यातूनच काही ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात काल आणि आज यवतमाळ, नाशिक, साकीनाका, गाेंदवले येथे लागलेल्या आगीत लाखाे रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समाेर आली आहे. (Breaking Marathi News)

नाशकात आग

नाशिक (nashik) शहरातील शालिमार जवळील वावरे लेन परिसरातील रहिवासी इमारतीतील एका घराला आग लागल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. फटाक्यांमुळे ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला. या पथकानं तत्काळ ही आग विझविली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी व वित्तहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच धावपळ उडाली होती.

यवतमाळातील आगीत लाखाेंचे नुकसान

यवतमाळातील (yavatmal) राळेगाव येथील क्रांती चौकाजवळील गुरुदेव प्रार्थना मंदिराच्या जवळच्या चार ते पाच दुकानाला साेमवारी रात्री मोठी आग लागली हाेती. या आगीत किराणा दुकान, एलआयसी कार्यालय व रेडिमेड कापडाचे दुकान जळून खाक झाले.

ऐनवेळी टँकरच्या माध्यमातून आगीवर बरेच नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या घटनेत लाखाे रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथिक माहिती उपलब्ध झालेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT