fire in garrage near akola city saam tv
महाराष्ट्र

Akola: वाशिम बायपास जवळ भीषण आग; गॅरेजचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

जयेश गावंडे

अकोला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील वाशिम (washim) बायपास जवळ असलेल्या गॅरेजला आज (बुधवार) सकाळच्या प्रहरी आग (fire) लागली. या आगीमध्ये गॅरेजमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. ऑइल आणि टायर व इतर साहित्य पूर्णपणे जळाले आहे. ही आग नेमकी कशामुळे हे अद्याप समजू शकले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने (fire brigade) शर्थीचे प्रयत्न केले. (akola latest marathi news)

ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा ते बारा बंबांनी प्रयत्न केले.आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी पाेहचले. त्यांनी परिसरात झालेली वाहतुकीची कोंडी दूर केली. गॅरेजचे शटर तोडण्यासाठी जेसीबीचा उपयोग करण्यात आला. आगीच्या धुरीचे लोट मोठ्या प्रमाणात निघत होते.

हिंदुस्थान मोटर्स पार्टस अँड ओल्ड मोटर्स पार्टस असे गॅरेजचे नाव असून इमरान अहमद यांचे हे गॅरेज आहे. त्यांना माहिती मिळताच त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एसीमुळे ही आग लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, अजूनपर्यंत ही आग नेमकी लागली कशामुळे हे समजू शकले नाही. जुने शहर पोलिस, शहर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी नागरिकांना दूर केले. तसेच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT