ratnagiri, fire, lote midc saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri Lote MIDC Fire News : लोटे एमआयडीसीत आगीच्या घटना वाढल्या; कंपन्यांची सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी

एमआयडीसीत कंपन्यांना पाण्याची कामतरता भासत आहे.

Siddharth Latkar

- जितेश कोळी

Lote Midc Fire News : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक औद्योगिक वसाहत असलेल्या लोटे एमआयडीसी येथील अरोमा इंटरमिजीएट्स कंपनीमध्ये रिएक्टरमधील केमिकल अचानक पेट घेतल्याने कंपनीच्या काही भागास भीषण आग लागली. (Maharashtra News)

गेल्या पाच दिवसांपासून लोटे एमआयडीसी येथील पाणी पुरवठा ठप्प असल्याने रासायनिक कंपन्यांमधील रिऍक्टर थंड करण्यासाठी पाण्याची कामतरता येथील कंपन्यांना भासत आहे. आज आरोमा कंपनीमध्ये झालेल्या आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणी जखमी झाले नसले तरी कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पाेलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. लोटे एमआयडीसी येथील कंपन्यांना एमआयडीसी विभागाकडून केला जाणारा पाणी पुरवठा वारंवार बंद ठेवला जात असल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना दरवर्षी मोठ्या प्रमाणात घडत असतात.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Create 80s Retro Photo: कोणताही Prompt न वापरता बनवा 80s च्या काळातील Vintage फोटो; AIचा नवा ट्रेंड व्हायरल

Sweet Corn Soup Recipe: संध्याकाळच्या भूकेसाठी झटपट घरी बनवा गरमागरम स्वीट कॉर्न सूप; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यातील बुधवार पेठेत एफडीएची मोठी कारवाई

CJP Protest MPSC : MPSC विरोधात दिपके मैदानात; विद्यार्थ्याच्या आत्महत्येनं पेपरफुटीचा वाद पेटला, MPSC विरोधात CJP आंदोलन उभारणार?

Sugarcane juice: उसाचा रस प्यायल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT