fire broke at doctors clinic near washim  saam tv
महाराष्ट्र

Washim Fire News : वाशिमच्या बालाजी मंदिरनजीकच्या क्लिनिकला आग, लाखोंचे नुकसान

या घटनेची माहिती वाशिम नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला स्थानिक नागरिकांनी दिली.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim News :

वाशिम शहरातील बालाजी मंदिराच्या मागे असलेल्या देव पेठ येथे डॉक्टर गोरे यांचे क्लिनिकला लागलेल्या आगीत लाखाे रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान या घटनेत काेणतीही जीवित हानी झाली नसल्याचे घटनास्थळावरुन सांगण्यात आले.

(Maharashtra News)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी - वाशिम शहरातील बालाजी मंदिराच्या मागे असलेल्या देव पेठ येथे डॉक्टर गोरे यांचे क्लिनिक आहे. या क्लिनिकला रात्री बाराच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

या आगीची माहिती वाशिम नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानंतर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी आग पूर्णपणे विझविली. या आगीत क्लिनिक साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत जूने सागवानी लाकडी साहित्य सुद्धा जळाले आहे. या आगीत लाखाेंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सोनम मस्करचा लक्षवेध, १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT