Vaibhav Naik Saam Tv
महाराष्ट्र

Vaibhav Naik: वैभव नाईक यांच्यावर गुन्हा! शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर फोडलं होतं PWD चं कार्यालय

Shivaji Maharaj Statue : सोमवारी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

Satish Kengar

विनायक वंजारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

सोमवारी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यलय गाठत तोफोड केली होती.

याच प्रकरणी आता वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करताना वैभव नाईक यांचा व्हिडिओही समोर आला होता. या व्हिडिओत आमदार वैभव नाईक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यलयात बॅट घेऊन शिरताना दिसत आहेत. याच बॅटने त्यांनी संतापात तोडफोड केल्याचं पाहायला मिळालं होतं.

दरम्यान, आज वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत म्हटलं की, ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक अरबी समुद्रामध्ये होणार, असं दहा वर्षे झाली सांगत आहेत. महाराष्ट्रातील जनता त्यांची हंडी फोडल्याशिवाय राहणार नाही.''

शिवरायांचा पुतळा कोसळणं हा अपघात असलीच मंत्री दीपक केसरकर म्हणाले होते. यावर बोलताना ते म्हणाले की, दीपक केसरकर यांचं वक्तव्य अत्यंत अशोभनीय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT