Nandurbar audio clip controversy, Vijay Chaudhary, Heena Gavit Saam TV marathi
महाराष्ट्र

BJP Maharashtra : भाजपाच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल, दिग्गज महिला नेत्याला जातिवाचक शिवीगाळ, राज्यात खळबळ

Nandurbar viral audio clip controversy : माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

सागर निकवाडे, नंदुरबार प्रतिनिधी

Nandurbar audio clip controversy, Vijay Chaudhary, Heena Gavit : नंदुरबारमधील बहुचर्चित कथित ऑडिओ क्लिप प्रकरण आता एका नव्या वळणावर पोहोचले आहे. भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याविरोधात कथित अर्वाच्य आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी, भाजपचे माजी प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय चौधरी यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दररोज व्हायरल होणाऱ्या नवनवीन क्लिप्स आणि त्यांतील संभाषणाचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचत असून, या प्रकारामुळे नंदुरबारचे राजकीय व सामाजिक वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

नंदुरबारमध्ये गेल्या पंधरवड्यापासून विजय चौधरी यांच्याशी संबंधित विविध ऑडिओ क्लिप्स प्रचंड व्हायरल होत आहेत. कधी अधिकारी, कधी पक्षाचे पदाधिकारी, तर कधी मंत्र्यांसोबतच्या कथित संवादांमुळे स्थानिक राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रसारीत होणाऱ्या या सर्व क्लिप्स 'एआय' (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने छेडछाड (Tamper) करून तयार करण्यात आल्याचा दावा विजय चौधरी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांच्या मुलाने नंदुरबार पोलिसांत आधीच तक्रार नोंदवली आहे.

असे असतानाच, आता विजय चौधरी यांचे मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच्या संवादाच्या कथित क्लिप्सही समोर आल्याने भाजपतील अंतर्गत गटबाजी उघड्यावर आली आहे. या क्लिप्सद्वारे थेट आमदार विजयकुमार गावित यांच्या कुटुंबाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होत आहे.

त्यातच डॉ. हिना गावित यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य करणारी एक क्लिप व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले. याप्रकरणी हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहन गावित यांच्या तक्रारीवरून विजय चौधरी यांच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह (जातीवाचक शिवीगाळ) इतर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर डॉ. हिना गावित यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत असून, कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे व तहसील कार्यालयावर धडक देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी थेट भाजप पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील आरोपीला जामीन

उज्जैनच्या मंदिरात चेंगराचेंगरीची स्थिती; नागचंद्रेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; ३ जण जखमी

Income Tax च्या ऑफिसला भीषण आग; परिसरात धराचे लोट, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी|VIDEO

भेसळयुक्त साखर कशी ओळखायची? घरी या’ 3 सोप्या स्टेप्सने करा चेक

Rahul Gandhi : राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; कारवाई थांबवण्याचे हायकोर्टाला आदेश, ईडी-सीबीआयलाही थेट सांगितलं

SCROLL FOR NEXT