ladki bahin yojana update  Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण, लाडकी बहीण योजनेत होणार बदल? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana update : लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असल्याचं भाष्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. भरणे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Bharat Mohalkar

लाडक्या बहिणींनी महायुतीला सत्ता मिळवून दिली पण आता याच बहिणींवरच सत्तेतल्या भावाचं प्रेम आटत चाललंय की काय असा प्रश्न विचारला जातोय. कारण सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींचा भार सरकारी तिजोरीला झेपेनासा झालाय. जास्तीत जास्त बहिणींना अपात्र कसं करता येईल यादृष्टीनं आधी निकषांची काटेकोर पडताळणी करण्यात आली..आणि आता थेट अर्थमंत्र्यांनीच योजनेत बदल करण्याची घोषणा करत लाडक्या बहिणींची धाकधूक वाढवलीय..

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात लाडकीसाठीच्या 9 हजार कोटींच्या निधीला कात्री लावण्यात आल्याचं समोर आलंय... त्यामुळे 53 लाख लाडक्या बहीणींना आपोआप वगळल्या जातील चर्चा सुरु झालीय.. लाडक्या बहीणीमुळे तिजोरीवर ताण आल्याची कबुलीच सरकारमधील मंत्री देतायत. तर लाडकी बहीण तुमच्याकडे मागण्यासाठी आली नव्हती, असं म्हणत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय.

लाडकीमुळे तिजोरीवर ताण आलाय, असे मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. लाडक्या बहीणी तुमच्याकडे मागायला आल्या नव्हत्या, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मात्र लाडक्या बहीण योजनेचे सध्याचे निकष काय आहेत? पाहुयात

लाडक्या बहीण योजनेचे निकष

लाडकीचं वय 18 ते 65 वर्षादरम्यान असावं

कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं

कुटुंबातील सदस्याच्या नावे चारचाकी असेल तर अपात्र ठरणार

घरात कुणीही शासकीय नोकरीला नसावं

लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटींची आवश्यकता असताना सरकारने केवळ 36 हजार कोटींची तरतूद केलीय.. लाडकीसाठी निधीची अपुरी तरतूद, आतापर्यंत 9 लाख लाडक्या बहीणींना वगळण्यात आलंय.. त्यामुळे नव्या निकषांनुसार 50 लाखांपेक्षा जास्त लाडक्या अपात्र होण्याची भीती वर्तवली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:नागरगावात ट्रान्सफॉर्मर जळून खाक; सिंचन व्यवस्था ठप्प, शेतकरी चिंतेत

पुण्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Forts Near Shivneri : शिवनेरी किल्ला पाहायला गेलाय? मग जुन्नरच्या डोंगररांगांतील 'या' ५ गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या

Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

SCROLL FOR NEXT