TET EXAM : अखेर टीईटी परीक्षा पुढे ढकलली!  SaamTvNews
महाराष्ट्र

TET EXAM : अखेर टीईटी परीक्षा पुढे ढकलली!

राज्यात १० ऑक्टोबर २०२१ रोजी टीईटी (TET Exam) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्याचदिवशी यूपीएससी (UPSC) प्रिलीमची परीक्षा असल्यानं राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

डाॅ. माधव सावरगावे

औरंगाबाद : राज्यात १० ऑक्टोबर २०२१ रोजी टीईटी (TET Exam) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्याचदिवशी यूपीएससी (UPSC) प्रिलीमची परीक्षा असल्यानं राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता १० ऑक्टोबर २०२१ ऐवजी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी टीईटीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. १० ऑगस्ट रोजी साम टीव्ही न्यूजने 'टीईटी आणि यूपीएससी परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थ्यी संभ्रमात' यावर बातमी दाखवली होती. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन अखेर परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने टीईटी आणि यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

हे देखील पहा :

राज्यात डीएड आणि बीएड पात्रताधारक भावी शिक्षकांसाठी १० ऑक्टोबर २०२१ रोजी टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार होती. त्याच दिवशी युपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने या दोन्ही परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा कोणती द्यायची असा प्रश्न पडला होता. १० ऑगस्ट रोजी साम टीव्ही न्यूजने यावर बातमी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने याबाबत निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेने तारखेत बदल केलेले परिपत्रक आपल्या वेबसाईटवर टाकले असून आता १० ऑक्टोबर ऐवजी ३१ ऑक्टोबर रोजी टीईटी होणार आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे सुधारित वेळापत्रक :

प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : १४ ऑक्टोबर २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२१

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 : ३१ ऑक्टोबर २०२१, वेळ सकाळी साडेदहा ते एक

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 : ३१ ऑक्टोबर २०२१, वेळ दुपारी २ ते ४:३०

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT