swabhimani shetkari sanghtana Latest News, Buldhana Latest News saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghtana : बैठक सुरु असतानाच 'स्वाभिमानी' चा राडा

दाेन गटात मारामारी झाल्याने शेतकरी देखील अचंबित झालेत.

संजय जाधव

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील गटबाजी नुकतीच समाेर आली आहे. या संघटनेतील दाेन गटात हाणामारी (fighting) झाली. आरोप प्रत्यारोप झाले त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचा शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana) गडास चिरा पडल्याचे दिसून आले.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळा या गावी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर हे आपल्या कार्यकर्त्यांसह नियोजित मोर्चा संदर्भात बैठक घेत हाेते. (maharashtra news) ही बैठक सुरु असताना या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे घाटाखालील अध्यक्ष श्याम अवताडे हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह पोहोचले.

यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या ठिकाणी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला. त्यानंतर विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत दिक्कर आपल्या कार्यकर्त्यांसह शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहोचले.

या ठिकाणी त्यांनी स्वाभिमानीच्या दुसऱ्या गटाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली जाईल असे आश्वासित केले. परंतु स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान अटकेच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. तसेच घोषणाबाजी देखील केली. यावेळी पोलिसांनी या ठिकाणी व जवळा गावात मोठा बंदोबस्त ठेवला हाेता. या घटनेची पुढील चौकशी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. (Latest Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांनी भरवली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शाळा

Meta कडून 1 कोटी Facebook अकाउंट ब्लॉक; यात तुमचा तर अकाउंट नाही ना? का केली कारवाई?

Ambenali Ghat Closed : आंबेनळी घाटातील वाहतुकीवर १५ ऑगस्टपर्यंत निर्बंध, दरड कोसळण्याचा धोका

Fact Check: दारू 50 टक्क्यांनी महागणार? मद्यपींच्या खिशाला मोठी कात्री? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Wrestler Divorce : नात्याला कुणाची नजर लागली? सायना नेहवालनंतर आणखी एका खेळाडूचा घटस्फोट; लग्नाच्या दोन वर्षांनी संसार मोडला

SCROLL FOR NEXT