Jayant Patil : त्यांची ही प्रृवत्ती लोकशाहीला मारक : जयंत पाटील

प्रत्येक पक्षातला आमदार सांभाळण्यासाठी शक्ती खर्च करावी लागत आहे.
Jayant Patil , Maval
Jayant Patil , Mavalsaam tv
Published On

Jayant Patil : काहीतरी फायदा घेऊन आता लोक पक्ष बदल करतात. याला काहीतरी घबाड मिळालं आहे अशी समजूत त्या त्या भागातील लोकांची महाराष्ट्रात (maharashtra) झाली आहे. त्याशिवाय एवढा मोठा निर्णय घेतला कसा, मग गावातील पारावर चर्चा होऊ लागल्या. तरुणांमध्ये (youth) चर्चा होते बारा कोटी, दुसरा म्हणतो नाही नाही अकरा घेतले असेल,काय सांगतो हा बाबा पंचवीस शिवाय ऐकेल का, लगेच मागचा म्हणतो अरे यार पन्नास यार. काय लावलाय तुम्ही ही लोक प्रतिनिधींच्या बद्दलची चर्चा भारतीय लोकशाहीचा पराभव करणारी आहे अशी टीका शिंदे फडणवीस सरकारवर नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच केली.

वडगाव मधील नवरात्र सरस्वती व्याख्यानमालेत जयंत पाटील (jayant patil) बाेलत हाेते. यावेळी मावळचे (maval) आमदार सुनील शेळके, भास्कर म्हाळास्कर आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले सध्याच्या काळात तत्त्वाचे राजकारण करण्याची प्रथा कमी झाली आहे. निवडणुकीच्या (election) राजकारणात व्यावसायिकता शिरलेली आहेत त्यामुळे सामाजिक बांधिलकी मागे पडत चाललेली आहे.

Jayant Patil , Maval
NCP : खासदार सुप्रिया सुळेंची शिष्टाई; एनसीपीतील दाेन गटाचा वाद मिटला

पूर्वीचे राजकारण विचारधारेवर गावच्या संस्कारावर व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून चालत होते. पूर्वीचे नेतेही सामाजिक बांधिलकीने प्रेरित झाले होते. त्यामुळे व्यक्ती सेवा प्रतिमेवर निवडून येत असे असेही पाटील यांनी नमूद केले.

पाटील पुढं म्हणाले सध्याच्या काळात मात्र अशी परिस्थिती राहिलेली नाही तत्त्वाची चर्चा आता राहिली नाही. निवडणुकीचे तिकीट देताना उमेदवाराची खर्च करण्याची क्षमता आहे का असा प्रश्न सर्वच पक्षाकडून विचारला जातो. जीवाभावाच्या खऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा कंत्राटी कामगारांची गर्दी अधिक झाली आहे. निवडून आलेल्या आमदार पुढच्या निवडणुकीत त्याच पक्षात राहील याची शक्यता देता येत नाही. त्यांची पक्ष नेतृत्वाची भीतीही राहिलेली नाही त्यामुळे प्रत्येक पक्षातला आमदार सांभाळण्यासाठी शक्ती खर्च करावी लागत आहे.

Jayant Patil , Maval
Supriya Sule : शंभूराज देसाईंच्या 'त्या' वक्तव्यावर सुप्रिया सुळे दुःखी

जास्त खर्च केल्यावर निवडून येतो अशी उमेदवारांनी मानसिकता तयारी केली आहे. हा प्रकार खरंच धक्कादायक आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवाराल सामाजिक बांधिलकीचीची जाणीव कमी झाला आहे. ही स्थिती लोकशाहीसाठी घातक असून लोकशाही जिवंत ठेवण्याची पराकाष्ठा प्रत्येक पक्षाला करावी लागेल. पाटील यांनी विविध राजकीय पक्षांमध्ये झालेल्या स्थितीवरही मत व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

Jayant Patil , Maval
Pandharpur : सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पंढरपूरात व्यापा-यांचा कडकडीत बंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com