RPI चा अपमान, रामदास आठवलेंचा संताप; नाराजीनंतर भाजपची धावाधाव, VIDEO

Mumbai Political News : मुंबईत जागा वाटपामुळे महायुतीत फूट पडलीय... तर भाजपनं केलेला अपमान सहन करणार नाही म्हणत महायुतीतील मित्रपक्षानं युती तोडलीय... मुंबईत नेमकं काय घडलं? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Ramdas Athawale NEWS
Union Minister Ramdas Athawale Saam Tv
Published On

मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.. आधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वबळाचा नारा दिलाय.. त्यात आता केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या रामदास आठवलेंनी भाजपने धोका दिल्याचा आरोप करत युती तोडलीय...

मात्र युती तोडण्याला कारणीभूत ठरलाय तो भाजपनं मुंबईत जागा वाटपाचा दिलेला प्रस्ताव... हा प्रस्ताव नेमका काय होता..पाहूयात..

मुंबईत 227 पैकी भाजप 137 तर शिंदेसेनेला 90 जागा देण्यात आल्या... त्यात रामदास आठवलेंनी 26 प्रभागांची यादी देत 16 जागांची मागणी केली होती.. मात्र भाजपनं रिपाईसोबत फक्त चर्चा करुन ताटकळत ठेवल्यानं आठवलेंचा संताप अनावर झालाय...

Ramdas Athawale NEWS
4 टर्म भाजप नगरसेवक,यंदा तिकीट कापलं; ऐनवेळी ठाकरे गटाकडून उमेदवारी, अकोल्यात नेमकं काय घडलं?

यामुळेच अखेर रामदास आठवलेंनी 39 जागांवर उमेदवार देत भाजपला आव्हान दिलंय... त्यामुळं भाजप नेत्यांची चांगलीच धावधाव झाली आणि प्रवीण दरेकरांनी थेट आठवलेंचं कार्यालय गाठलं. आठवलेंच्या भेटीनंतर दरेकरांनी त्यांची समजूत काढली. आणि त्यानंतर आठवलेंचेही सूर बदलले...

Ramdas Athawale NEWS
आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण? संपूर्ण पुण्यात जोरदार चर्चा

मुंबईतील चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, मानखुर्द परिसरात रामदास आठवलेंचा मोठा प्रभाव आहे.... आठवलेंना मानणारी 8 टक्के व्होटबँक आहे... त्यानंतरही भाजपनं आठवलेंना डावललं... त्यामुळे आठवलेंची समजूत काढल्यानंतर आता उमेदवारी माघार घेण्याच्या दिवसापर्यंत भाजपचे उमेदवार माघार घेऊन आठवलेंच्या जागा ठेवणार की महायुतीतील असंतोष असाच वाढत जाणार... यावर महापालिकेच्या विजयाचं समीकरण अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com