satara, medha, medha police station saam tv
महाराष्ट्र

Satara : 'कुणी मला विचारल्याशिवाय हात उचलला तर तुम्हांला फाेडीन एकेकाला'; पाेलीस ठाण्यात राडा

त्यापुर्वी झालेल्या घटनेत दाेन्ही गटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

Satara News : युवकांच्या मारामारी नंतर सातारा जिल्ह्यातील मेढा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यावरुन राडा झाला. यावेळी दाेन गट एकमेकांमध्ये भिडले. त्यामुळे मेढा पाेलीस (police) ठाण्यात तणावाचं वातावरण हाेते. या घटनेनंतर पाेलीसांनी एका गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती मेढा (medha) पाेलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी माने यांनी साम टीव्ही डिजीटलशी बाेलताना दिली. (Breaking Marathi News)

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातून नुकतेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी निवडून आलेल्या एका संचालकाच्या नातेवाईकाची आणि जावळीत आजही आपला दबदबा असावा अशी सुप्त इच्छा बाळगलेल्या एका नेत्याच्या कार्यकर्त्याची वाहना चालविण्यावरुन वादा वादी झाली. त्याचे पर्यवसन मारामारीत झाले. (Satara Latest Marathi News)

दाेन्ही युवकांनी मारामारी झाल्यानंतर आपल्या सहकारी मित्रांना याची कल्पना दिली. त्यानंतर जिल्हा बॅकेचे नवनिर्वाचित संचालकाच्या गटानं दुस-या युवकाला मारलं. त्यामुळे वाद वाढला. त्यानंतर दाेन्ही गट भिडले.

दाेन्ही गटांनी पाेलीसांत तक्रारी दाखल केल्या. पाेलीसांनी दाेन्ही गटाचे म्हणणे लक्षात घेत गुन्हा दाखल केला. दरम्यान जिल्हा बॅंकेच्या नूतन संचालकांबराेबर आलेल्या काही कार्यकर्त्यांनी पाेलीसांना अमुक अमुक गुन्हा दाखल करा असा आग्रह धरला. परंतु त्यास पाेलीसांनी स्पष्ट नकार दिला.

त्यामुळे कार्यकर्ते भडकले त्यांनी पाेलीसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. कसं हाेत नाही. सस्पेंड करीन. तेव्हा शांत राहीन असा दम भरण्यात आला. तसेच आपल्याच कार्यकर्त्यांना कुणी मला विचारल्याशिवाय हात उचलला तर तुम्हांला फाेडीन एकेकाला असा इशारा दिला. या प्रकारामुळं पाेलीस ठाण्यातच वातावरण तंग झाले. त्यापुर्वी दाेन्ही गट पाेलीस ठाण्यात देखील भिडले हाेते. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला.

दरम्यान या घटनेबाबत साम टीव्ही डिजीटलच्या प्रतिनिधीशी बाेलताना प्रभारी अधिकारी माने म्हणाले पाेलीस ठाण्यात दंगा झाला हे खरं आहे. त्यापुर्वी झालेल्या घटनेत दाेन्ही गटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पाेलीस ठाण्यात दंगा करणा-यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याने एनसी दाखल केली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: तेव्हा मूग गिळून का बसले होते? खासदार नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Pune : पुण्यात बिबट्याचा धुमाकूळ; १३ वर्षीय मुलाचा जीवघेणा हल्ल्यात मृत्यू, ग्रामस्थांनी वनविभागाचं कार्यालय पेटवलं

India W vs South Africa W Final: रिप्लेसमेंट म्हणून आली, फायनलमध्ये चमकली, 'लेडी सेहवाग'ची अंतिम सामन्यात धुव्वाधार बॅटिंग

Maharashtra Live News Update: पुण्यात कोरेगाव पार्क अपघात प्रकरणी अपडेट; तिसऱ्या तरुणाचा मृत्यू

Bigg Boss 19: 'प्रत्येकाचं शरीर वेगळे असतं...'; सलमान खानसमोर रडली अशनूर कौर, म्हणाली- लाज वाटली पाहिजे...

SCROLL FOR NEXT