Sangli, NEET Exam, NTA
Sangli, NEET Exam, NTA saam tv
महाराष्ट्र

NEET 2023: नीट परीक्षा काळात सांगलीत विद्यार्थिनींशी गैरवर्तन; अंतर्वस्त्र काढा, कपडे उलट घाला, पालकांची NTA कडे धाव (पाहा व्हिडिओ)

विजय पाटील

Neet Exam News : सांगली येथे झालेल्या नीट परीक्षे (National Eligibility cum Entrance Test 2023) दरम्यान अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचा समोर आले आहे. परीक्षा केंद्रामध्ये आलेल्या विद्यार्थिनींना त्यांचे अंगावरील कपडे आणि अंतर वस्त्र उलटे परिधान करायला लावून परीक्षा द्यायला लावण्याचा प्रकार घडला. याबाबत जागृत पालकांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे (NTA) तक्रार केली आहे. (Maharashtra News)

देशभरात रविवारी (सात मे) नीट परीक्षा पार पडली. सांगलीत परीक्षेदरम्यान अत्यंत धक्कादायक प्रकार विद्यार्थिनींच्या बाबतीत घडल्याचा समोर आला आहे. सांगली शहरातील एका महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्यासाठी चक्क त्यांचे कपडे आणि अंतरवस्त्र उलटे परिधान करायला लावण्याचा प्रकार समोर आला आहे.

परीक्षेसाठी येणा-या विद्यार्थिनींची तपासणी करून त्यांना त्यांचे कपडे उलटे परिधान करायला लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थिनींना आणि सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आपले कपडे त्या ठिकाणी असणाऱ्या खोल्यांमध्ये बदलून ते उलटे घालून परीक्षा द्यावी लागली.

नीट परीक्षा संपल्यानंतर बाहेर आलेल्या विद्यार्थिनींच्या अंगावरील कपडे उलटे पाहून पालकांना याबाबत प्रश्न पडला होता. त्याबाबत विचारणा केली असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.

त्यानंतर घडलेल्या प्रकारावर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकाराबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे काही पालकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

दरम्यान सांगलीतील या धक्कादायक प्रकरणानंतर ज्या ठिकाणी परीक्षा पार पडल्या त्या कॉलेज प्रशासनाकडून त्यांचा या परीक्षेची कसलाही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आले आहे. केवळ परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला जागा उपलब्ध करून देण्यात आली हाेती. त्यामुळे घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghati Hospital : घाटी रुग्णालयातील नर्सेसचे काम बंद; मनुष्यबळ वाढविण्याची मागणी 

Hingoli Krushi Utpanna Bazar Samiti : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हिंगाेलीत आठवड्यातून पाच दिवस हळद खरेदी सुरू करणार

Gallbladder Stone : पित्त खड्यांमुळे होऊ शकतो कर्करोग; वेदना कायमच्या दूर करण्यासाठी ५ रामबाण उपाय

Today's Marathi News Live : नाराज आबा बागुल काँग्रेस रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात

Salman Khan News : भाईजान अर्ध्या रात्री लंडनहून मुंबईत परतला; विमानतळावर पापाराझींची नजर चुकवत गाठलं घर

SCROLL FOR NEXT