Shambhuraj Desai : 70 हजार कोटी खर्च करून 1 टक्काही..., फाईल क्लिअरवरुन शंभूराज देसाईंचा अजित पवारांना चिमटा

मंत्री देसाईंनी आज कराड येथे पत्रकार परिषद घेतली.
Shambhuraj Desai, Ajit Pawar, Karad News, Eknath Shinde
Shambhuraj Desai, Ajit Pawar, Karad News, Eknath Shindesaam tv
Published On

Karad News : गडबडीत फाईल क्लिअर केल्या की 70 हजार कोटी खर्च करून 1 टक्काही काम होत नाही असा अनुभव पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी मुख्यमंत्री असताना आणि अजित पवार (ajit pawar) हे उपमुख्यमंत्री असताना सांगितला हाेता. त्यावेळी 70 हजार कोटी खर्च करून एक टक्का देखील जमीन सिंचनाखाली आली नव्हती.

घाई गडबडीत फाईल क्लिअर केल्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात तसं हाेते, त्यामुळे आम्ही गतीने नव्हे गांभीर्याने काम करताे असा चिमटा साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी विराेधी पक्ष नेत्यांच्या (ajit pawar in satara) मुख्यमंत्र्याच्या (eknath shinde) 65 फाईल क्लिअर केल्यावरील टीकेवर काढला. (Maharashtra News)

Shambhuraj Desai, Ajit Pawar, Karad News, Eknath Shinde
Karnataka Elections 2023 : भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री कन्नडीगांच्या प्रचाराला; विनायक राऊतांची शिंदेंवर टीका (पाहा व्हिडिओ)

साेमवारी (ता. 8) अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर टीका केली. मुख्यमंत्री गावी आले असताना दाेन, तीन दिवसांत 65 फाईल्स क्लिअर केल्या म्हणे आम्ही त्या दाेन तीन तासांत करताे असे पवार यांनी म्हटलं. त्यावर आज कराड येथे माध्यमांनी पालकमंत्री शंभूराज देसाईंना छेडले.

Shambhuraj Desai, Ajit Pawar, Karad News, Eknath Shinde
Devendra Fadnavis In Belgaum : बेळगावत देवेंद्र फडणवीसांना दाखविले काळे झेंडे; महाराष्ट्र एकीकरण समिती अन् पाेलिसांची झटापट (पाहा व्हिडिओ)

आम्ही चार चार वेळा बघून फाईल क्लिअर करतो. पब्लिक इंटरेस्ट फाईल असेल तर तात्काळ निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न असताे. आम्हांला लोकांचं हित महत्वाचं आहे. राज्याच्या तिजोरीतील पैसा योग्य प्रमाणात खर्च झाला पाहिजे याची खबरदारी आम्ही घेतो. मुख्यमंत्री सुट्टीवर गावी आले असताना त्यांच्या गावची यात्रा असताना त्यांनी कामकाज सुरु ठेवले. त्यावेळी त्यांनी 65 फाईल्स क्लिअर केल्या हे अजितदादांना याची माहिती नसेल असे देसाईंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com