Mahad: महिला सरपंच बलात्कार व हत्या प्रकरणात; ऑस्कर श्वान ठरला 'हिरो' Saam TV
महाराष्ट्र

Mahad: महिला सरपंच बलात्कार व हत्या प्रकरणात; ऑस्कर श्वान ठरला 'हिरो'

ऑस्कर सोबत इतर सहाही श्वान हे आपली कामगिरी चोख बजावत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड : एखादा खून, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे घडल्यानंतर त्यातील आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले असते. तांत्रिक तपास यंत्रणेच्या मदतीने तपास सुरू होतो मात्र तरीही अनेक अडचणी पोलिसांना येत असतात.  अशावेळी डॉग स्कॉड पथकाची मदत महत्वपूर्ण ठरली जाते. मनुष्य बळाचे प्रयत्न अपुरे पडत असताना पोलीस दलातील जवान म्हणून काम करणारे श्वान हे आपल्या पोलीस सहकार्याच्या मदतीला धावून येतात आणि आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळवून देतात. रायगड पोलीस दलातील ऑक्सर या श्वानाने महाड (Mahad) येथील सरपंच महिला खून प्रकरणात आणि वडखळ येथील एका हत्येप्रकरणात महत्वाची भूमिका बजावली असून दोन्ही गुन्ह्याचा शोध पोलिसांनी (Police) काही तासातच लावून आरोपींना जेरबंद केले आहे. ऑस्कर सोबत इतर सहाही श्वान हे आपली कामगिरी चोख बजावत आहेत.

रायगड पोलीस (Raigad Police) याच्या खांद्याला खांदा लावून पोलीस दलात मर्फी, ऑस्कर, रॉकी, मॅक्स, ब्रुनो, रुफस, डस्टी हे श्वान आपली सेवा देत आहेत. सात पैकी एक असलेला ऑस्कर श्वान याने जिल्ह्यातील वडखळ आणि महाड येथील हत्येप्रकरणात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर घरफोडी गुन्हे शोधण्यास मदत केलेली आहे. ऑस्कर याचा जन्म 12 मार्च 2019 रोजी झाला असून डॉबर जातीचा हा श्वान आहे. 2020 साली ऑस्कर हा पोलीस दलात डॉग स्कॉड पथकात कार्यरत झालेला आहे. डॉग स्कॉडचे मंगेश निगडे आणि निमेश माळवी हे दोन हँडलर पोलीस कर्मचाऱ्यांनी ऑस्करला प्रशिक्षित केले आहे. सकाळ, संध्याकाळ माळवी आणि निगडे हे ऑस्कर याचा गुन्ह्यातील आरोपीला सुगंधावरून कसे पकडायचे याचा सराव देत असतात. त्यामुळे अत्यंत कठीण गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यासाठी ऑस्कर हा तरबेज झाला आहे. सातही श्वानसाठी प्रत्येकी दोन हँडलर श्वान पथकात आहेत.

महाड तालुक्यातील आदिस्ते गावच्या सरपंच याचा 27 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास हत्या करून बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात रायगड पोलीस यांनी तपास सुरू केला होता. मात्र गुंतागुंतीच्या या प्रकरणात पोलीस हे आरोपी पर्यत पोहचत नव्हते. अशावेळी पोलिसांनी मदतीसाठी डॉग स्कॉड मधील ऑस्कर श्वानाला घटनास्थळी आणण्यात आले. आरोपीने महिलेच्या डोक्यात मारण्यासाठी घेतलेल्या लाकडाचा वास ऑस्कर यास दिला. त्यानंतर ऑस्कर याने वासाच्या मागोवा घेत आरोपीपर्यंत पोलिसांना पोहचविले. त्यामुळे हत्येतील मुख्य आरोपीला पकडण्यात महाड पोलिसांना यश आले. त्यामुळे या हत्याप्रकारणाचा छडा 48 तासात ऑस्करच्या मदतीने लावण्यात यश मिळाले. वडखळ पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या हत्येप्रकरणातही ऑस्कर यांनी महत्वाची भूमिका बजावून आरोपी पकडण्यात पोलिसांना सहकार्य केले.

जिल्ह्यात 2008 सालापासून डॉग स्कॉड पथक तयार करण्यात आले. पूर्वी लिली आणि मायलो हे दोन श्वान पोलीस दलात कार्यरत होते. दोन्ही श्वान यानीही अनेक गुन्हे आणि आरोपी शोधून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. लिली आणि मायलो याचा मृत्यू झाला असून आता ऑस्करसह सहा श्वान आज रायगड पोलीस दलात आपली सेवा चोख बजावत आहेत. स्फोटक शोधणे, अमली पदार्थ, हत्या, घरफोडी यासारख्या महत्वाच्या गुन्ह्यात हे श्वान पोलिसांना मदत करीत असतात. डॉग स्कॉड पथकामुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यात आणि आरोपीला लवकरात लवकर शोधण्यात ऑस्करसह इतर सहाही श्वान सेवा देत आहेत. त्यामुळे रायगड पोलिसांसोबत श्वानही पोलीस दलाचे नाव उंचावत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT