rto officer seizes bus kumbhmela  Saam Tv
महाराष्ट्र

Mahakumbh: 'आप कुंभमेला कैसे जाते हो, मैं देखती हूँ'; नगरमध्ये महिला RTO अधिकाऱ्याची मुजोरी, नेमकं काय घडलं?

RTO Officer Seizes Bus Kumbh Mela Devotees: महिला आरटीओ अधिकाऱ्याच्या मुजोरीमुळे कुंभमेळ्याच्या भाविकांची बस जप्त करण्याची घटना घडली आहे.

Saam Tv

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील नेप्ती येथील भाविक कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला निघाले होते. मात्र, पार्किंगमध्ये उभी असलेली त्यांची बस आरटीओ अधिकाऱ्याने ताब्यात घेतली, दंडात्मक कारवाई करून ती आरटीओ कार्यालयात लावली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्याने, "आप प्रयागराज कैसे जाते, अब मैं देखती हूँ" असे म्हणत कारवाई केली, असा आरोप भाविकांनी केला आहे. अचानक बस जप्त केल्यामुळे भाविकांचे कुंभमेळ्याचे नियोजन बिघडले आणि त्यांना प्रयागराजला जाता आले नाही.

या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गटाने तीव्र निषेध करत आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन छेडले. संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

"कारवाई जाणून-बुजून करण्यात आली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर मोठे आंदोलन उभारू," असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT