मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

Maharashtra Education Department : ८ व ९ जुलैला सुट्टी कुठल्या सणामुळे किंवा नियोजित नव्हती, तर हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे होती.
Maharashtra The Education Department
Maharashtra The Education Department Saam Tv News
Published On

मुंबई : आज रविवारची सुट्टी आणि आषाढी एकादशीचा उत्साह संपत नाही तोच, विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली होती. उद्या, सोमवारी शाळेची घंटा वाजेल, पण त्यानंतर लगेचच पुढचे दोन दिवस, म्हणजेच मंगळवार (८ जुलै) आणि बुधवार (९ जुलै) रोजी राज्यातील बहुतांश शाळा पुन्हा बंद राहणार आहेत. मात्र, त्यातच आता शिक्षण विभागाने पुन्हा नवीन आदेश काढले आहेत. तो म्हणजे, ८ णि ९ जुलैला राज्यातील कुठल्याही शाळा बंद राहणार नाहीय.

८ व ९ जुलैला सुट्टी कुठल्या सणामुळे किंवा नियोजित नव्हती, तर हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे होती. त्यामुळे पालकांनी याची नोंद घेऊन आपलं नियोजन करावं, असं आवाहन देखील करण्यात आलं होतं. मात्र, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचं हित पाहता राज्यातील शाळा बंद राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांनी हे आदेश काढले आहेत.

Maharashtra The Education Department
तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

नेमकं प्रकरण काय?

गेल्या काही वर्षांपासून अनुदानाचा मुद्दा प्रलंबित आहे. गेल्या वर्षी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा यासाठी १ ऑगस्ट २०२४ पासून महाराष्ट्रात सलग ७५ दिवस विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती. या आंदोलनांची दखल घेत सरकारने त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. परंतु प्रलंबित अनुदान आणि आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसलं.

एक वर्षांहून अधिक काळ उलटूनही शिक्क आणि शिक्षकेत्तर आली आहे. याच काकर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागणीकडे सरकारने अद्यापही गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही. आश्वासने देऊनही त्यांची पूर्तता न झाल्याने आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात रणामुळे ८ आणि ९ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Maharashtra The Education Department
Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com