Ranjit Kasale  Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad: वाल्मिक कराडपासून जीवाला धोका? रणजित कासलेला दुसऱ्या तुरुंगात हलवलं

Ranjit Kasale : बीडचे निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासलेला दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आले आहे. वाल्मिक कराडमुळे जिवाला धोका असल्याच्या शक्यतेमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आले.

Priya More

योगेश काशिद, बीड

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड असलेल्या कारागृहात बीडचा बडर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेला ठेवण्यात आले होते. पण वाल्मिक कराडपासून जीवाला धोका असू शकतो त्यामुळे रणजित कासलेला दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आलं. वाल्मिक कराड असलेल्या जिल्हा कारागृहामधून सुरक्षेच्या कारणावरून रणजित कसलेला छत्रपती संभाजी नगरच्या हरसूल जिल्हा कारागृहात हलवले.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये आहे. वाल्मिक कराडसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलेले बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. रणजित कासलेला सुरक्षेच्या कारणावरून बीड जिल्हा कारागृहामधून हलवण्यात आले. त्याला छत्रपती संभाजीनगरच्या हरसूल कारागृहामध्ये हलवण्यात आले आहे.

रणजित कासलेविरोधामध्ये ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होता आणि त्याच प्रकरणात तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये तो होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्याला हलवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच जिल्हा कारागरामध्ये आहे आणि बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेने आपल्याला वाल्मीक कराडच्या फेक एन्काऊंटरची ऑफर आल्याचे सांगितलं होतं. त्याचबरोबर काही गंभीर आरोप केले होते.

याच कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेला बीडच्या जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा कारागरामध्ये हलवण्यात आले आहे. या अगोदर देखील या जिल्हा कारागृहामधील गीते गँग आणि आठवले गँगला सुरक्षेच्या कारणास्तव हलवले होते. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि गीते गँग आणि आठवले गँगमध्ये वाद झाला होता. या वादानंतर या दोन्ही गँगला वेगवेगळ्या कारागृहांमध्ये हलवण्यात आले होते. आता रणजित कसलेला सुरक्षेच्या कारणास्तव हलवल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

SCROLL FOR NEXT