FDA officials seize illegal drug stock in Nagpur and expose counterfeit Cetaphil products during raids in Pune. saam tv
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! नागपूरात बनावट डॉक्टरचा पर्दाफाश, पुण्यात नकली स्किनकेअरचा धक्कादायक प्रकार

Fda Sction Nagpur Fake Doctor Pune Counterfeit Cetaphil Bust: महाराष्ट्र FDA ची दुहेरी कारवाई; नागपूरमध्ये बोगस डॉक्टरकडून 1.07 लाखांचा औषधसाठा जप्त, तर पुण्यात बनावट Cetaphil उत्पादनाचा पर्दाफाश. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले.

Omkar Sonawane

नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि विश्वासार्ह औषधे तसेच सौंदर्यप्रसाधने उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA), महाराष्ट्र राज्याने नागपूर आणि पुणे येथे दोन स्वतंत्र कारवायांमध्ये मोठे गैरप्रकार उघडकीस आणले आहेत. या कारवाईत नागपूर जिल्ह्यातील एका बोगस डॉक्टरकडून विना परवाना विक्रीसाठी ठेवलेला सुमारे 1.07 लाख किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला असून पुण्यात प्रसिद्ध Cetaphil ब्रँडचे बनावट सौंदर्यप्रसाधन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये बोगस डॉक्टरविरोधात कारवाई

अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 22 जून रोजी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कोथुळना येथील प्राथमिक सामुदायिक इलेक्ट्रो होमिओपॅथिक उपचार केंद्राची तपासणी करण्यात आली. हे केंद्र बोगस डॉक्टर मोनिदीप सरकार यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले. तपासणीदरम्यान संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथिक औषधांचा साठा आढळून आला. औषधांच्या खरेदीसंदर्भातील बिले किंवा इतर कागदपत्रे मागविण्यात आली असता ती सादर करण्यात अपयश आले. तसेच वैध औषध विक्री परवाना नसतानाही औषधांची खरेदी, साठवणूक आणि विक्री केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणात औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम 1940 मधील कलम 18(C), 18A आणि नियम 1945 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याने सुमारे 1 लाख 7 हजार किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या औषधांमध्ये अँटिबायोटिक्स, अँटीफंगल औषधे, इंजेक्शन्स आणि मल्टिव्हिटॅमिन्सचा समावेश आहे.

पुण्यात बनावट Cetaphil उत्पादन जप्त

दरम्यान, पुणे कार्यालयाने केलेल्या तपासणीत Cetaphil Gentle Skin Cleanser (118 ml) या प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन उत्पादनाची बनावट आवृत्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे उघड झाले.

या उत्पादनाचा नमुना मूळ उत्पादक कंपनीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. प्रयोगशाळा चाचणीत गुणवत्ता समाधानकारक असली तरी लेबल, पॅकेजिंग, मुद्रण, सुरक्षा वैशिष्ट्ये आणि अधिकृत उत्पादनाशी तुलना केल्यानंतर गंभीर विसंगती आढळून आल्या.

मूळ उत्पादक Encube Ethicals Pvt. Ltd. आणि विपणनकर्ता Galderma India Pvt. Ltd. यांनीही हे उत्पादन त्यांच्या अधिकृत उत्पादन प्रक्रियेतून तयार झालेले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सदर उत्पादन "स्प्युरियस कॉस्मेटिक" म्हणजेच बनावट सौंदर्यप्रसाधन असल्याचे निश्चित करण्यात आले.

यानंतर पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील ओम केमिस्ट या विक्रेत्याकडून 5,508 किमतीचा बनावट साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चतु:शृंगी पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0277/2026 नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4), 336(3) आणि 340(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, "नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि विश्वासार्ह औषधे व सौंदर्यप्रसाधने उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. बनावट किंवा बेकायदेशीर उत्पादनांच्या व्यवहारात सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात येईल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेनेच्या नेत्याकडून बाळासाहेबांची खिल्ली, पावसकरांच्या लेखी शिवसेना पाळणाघर

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये विकास निधीवरून श्रेयवाद पेटला

सर्व बंडखोर खासदारांना उमेदवारीची हमी, शिंदेंकडून 2029च्या उमेदवारांची घोषणा

Maharashtra Police Department: राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे झाली बदली?

फुटीर खासदारांची भोंदूगिरी, बंडखोर खासदारांचा बुरखा टराटरा फाटला; बंडखोर 6 खासदार निधी खर्चात नापास

SCROLL FOR NEXT