TUKARAM MUNDHE'S BIG DECISION: HOSPITALS CANNOT FORCE PATIENTS TO BUY MEDICINES FROM IN-HOUSE PHARMACIES Saam Tv
महाराष्ट्र

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा 'ॲक्शन मोड'वर! आता राज्यातील रुग्णालयांना दिला थेट कारवाईचा इशारा; काय आहे कारण?

Maharashtra FDA Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासगी रुग्णालयांना कडक इशारा दिला आहे. रुग्णांना रुग्णालयातील फार्मसीतूनच औषधे खरेदी करण्यास सक्ती करता येणार नाही.

Alisha Khedekar

  • FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय घेतला

  • रुग्णालयांना औषधे खरेदी करण्यासाठी रुग्णांवर दबाव टाकता येणार नाही

  • रुग्णांना कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करण्याचे स्वातंत्र्य

  • डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देणे बंधनकारक

  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर FDA कडून कठोर कारवाई

Maharashtra FDA Commissioner Tukaram Mundhe महाराष्ट्राचे डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागात ट्रान्स्फर करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात होणाऱ्या अवैध गोष्टी मोडून काढण्यात आल्या. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा खासगी रुग्णालयांकडे वळवला असून रुग्णांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषधे खरेदी करण्यास रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना सक्ती करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश त्यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, अनेक रुग्णालयांकडून रुग्णांना त्यांच्या अंतर्गत फार्मसीमधूनच औषधे खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी FDA कडे सातत्याने येत होत्या. मात्र, कोणतेही रुग्णालय किंवा संस्था रुग्णांवर अशा प्रकारची सक्ती करू शकत नाही. औषधे कुठून खरेदी करायची हा पूर्णपणे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा वैयक्तिक अधिकार आहे.

राज्यातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये स्वतःच्या औषध विक्री केंद्रांची व्यवस्था असते. अनेक वेळा रुग्णालयातील फार्मसीमध्ये औषधांचे दर जास्त असल्याच्या तक्रारी समोर येतात. याउलट बाहेरील मेडिकल स्टोअर्समध्ये तीच औषधे कमी किमतीत किंवा जेनेरिक स्वरूपात उपलब्ध असतात. तरीही काही रुग्णालयांकडून बाहेरून औषधे आणण्यास मज्जाव केला जात असल्याचे प्रकार समोर आले होते.

या पार्श्वभूमीवर FDA ने कठोर भूमिका घेत नवीन आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार डॉक्टरांनी रुग्णांचे औषधांचे प्रिस्क्रिप्शन त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर रुग्णांना त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असेल. मुंढे यांच्या या निर्णयामुळे रुग्णांची होणारी आर्थिक लूट रोखण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मोठी घोषणा',अमोल कोल्हेंच्या पोस्टने खळबळ; राजकारण की नवी मालिका?

Maharashtra News Live Update: पुण्यात गादी कारखान्याला आग

Children's Health: शाळा सुरू होताच मुलांच्या आरोग्याचा धोका वाढला; तज्ज्ञांनी पालकांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

Bus Accident: भीषण अपघात! बस खोल दरीत कोसळून 40 जणांचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी

Maharashtra Government : राज्य सरकारचा मोठा निर्णय, शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग' विकण्यावर बंदी, कारणही सांगितलं

SCROLL FOR NEXT