Fatima Sheikh Birth Anniversary 
महाराष्ट्र

Fatima Sheikh: फातिमा शेखांच्या जयंतीलाच वादाचं मोहोळ; फुलेंसोबतची फातिमा काल्पनिक?

Fatima Sheikh Birth Anniversary: स्त्री शिक्षणात योगदान देणाऱ्या फातिमा शेख यांच्या जयंतीलाच त्यांच्या अस्तित्वारूनच वाद निर्माण झालाय. नेमका वाद काय आहे? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Vinod Patil

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंसोबत स्त्री शिक्षणात योगदान देणाऱ्या फातिमा शेख यांच्या जयंतीलाच त्यांच्या अस्तित्वारूनच वाद निर्माण झालाय. इतिहासातलं फातिमांचं पात्र काल्पनिक असल्याचा दावा माहिती प्रसारण खात्याचे माध्यम सल्लागार दिलीप मंडल यांनी केलाय. फातिमा शेख कोण होत्या? त्यांच्यावरून नेमका वाद काय आहे? यावरचा हा विशेष रिपोर्ट..

महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणासाठी योगदान देणाऱ्या फातिमा शेख यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलंय. विशेष म्हणजे फातिमा शेख यांच्या जयंतीदिनीच त्यांच्या अस्तित्वाचा वाद उफाळून आलाय. ज्येष्ठ पत्रकार आणि माहिती प्रसारण खात्याचे सल्लागार दिलीप मंडल यांनी फातिमा शेख हे काल्पनिक पात्र असल्याचा दावा केलाय. दिलीप मंडल यांनी ट्विटमधून काय म्हटलंय ते पाहूया.

'फातिमा शेख काल्पनिक पात्र'

फातिमा शेख एक काल्पनिक पात्र आहे. त्यांच्या कार्याचा एकही ऐतिहासिक पुरावा नाही. त्यांना हवेतून निर्माण करण्याच्या गुन्ह्यात मीही सहभागी होतो. असा दावा त्यांनी केलाय. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापूर्वी दिलीप मंडल हे मोदी सरकार आणि हिंदुत्व विचारसणीचे मोठे टिकाकार होते. मात्र २०२४ मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची माहिती प्रसारण खात्यात वर्णी लागली. नेमके कोण आहेत दिलीप मंडल ते पाहूयात

कोण आहेत दिलीप मंडल?

2024 पासून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे माध्यम सल्लागार

दोन दशकांपेक्षा अधिक काळ पत्रकार, अनेक वर्तमान पत्रात स्तंभलेखन

ओबीसी, SC आणि ST समाजाच्या प्रश्नांवर लिखाण

हिंदुत्वाच्या राजकारणाचे टीकाकार अशी एकेकाळी ओळख

दिलीप मंडल यांनी अनेक पुस्तकांचं लिखाणही केलंय

मात्र मंडल य़ांचा दावा सत्यशोधक चळवळीच्या अभ्यासकांनी खोडून काढलाय. सावित्रीबाई फुलेंच्या पत्रव्यवहारात फातिमा शेख यांचा उल्लेख असल्याचं फुले अभ्यासकांनी म्हटलंय. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंसोबत फातिमा शेख यांनीही स्त्रियांना शिकवण्यात योगदान दिल्याचं इतिहासकार सांगतात. त्यामुळे त्या पहिल्या महिला मुस्लीम शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात

कोण आहेत फातिमा शेख?

फातिमा शेख यांचा पुण्यात 9 जानेवारी 1831 ला जन्म

स्त्री शिक्षणासाठी फातिमा शेख आणि त्यांचा भाऊ उस्मान शेख यांचा महात्मा फुलेंना मदतीसाठी पुढाकार

1848 मध्ये फातिमा शेख यांच्या घरात महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केल्याचा उल्लेख

इतिहासातल्या अनेक व्यक्ती आणि घटनांबाबत नेहमीच काही ना काही वाद होत असतात. मात्र एखाद्याची विचारसरणी बदलली म्हणून इतिहासातलं योगदान नाकारून कुणावर अन्याय व्हायला नको. त्यामुळे यावर चिकित्सा होण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

Aadhaar-Pan Linking: हे काम आताच करा, अन्यथा ३१ डिसेंबरला येणार नाही पगार

SCROLL FOR NEXT