Mantralaya Lamborghini Mystery: मंत्रालयात लम्बोर्गीनी कुणाची? ना गेटवर अडवलं, ना चेकिंगसाठी थांबवलं

Lamborghini in Mantralaya : मंत्रालयात आलेल्या काळ्या काचांच्या अलिशान लम्बोर्गीवरून गूढ वाढलंय....गेटवर चेक न करता आलेल्या या लंबोर्गीनीत कोण होत? कोणत्या मंत्र्याकडे ही बडी हस्ती गेली? नेमकं काय शिजलं मंत्रालयात? यावरचा हा रिपोर्ट.
Lamborghini in Mantralaya :
Mantralaya Lamborghini Mystery: saam tv
Published On

ही काळ्या काचा लावलेली अलिशान लम्बोर्गीनी कार मंत्रालयात दुपारी 3 वाजता धडकली आणि मंत्रालयात आलेल्या सर्वांचंच लक्ष तिनं वेधून घेतलं.कारण सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी तासंतास प्रतीक्षा करावी लागते. मात्र या अलिशान लम्बोर्गीनीला गेटवर ना कुणी अडवलं ना चेंकिंगसाठी कुणी थांबवलं.त्यामुळे सर्वांच्याच नजरा या लम्बोर्गीनीकडे वळल्या..

पार्किंगमध्ये थाटात उभी राहिल्यानंतर या लम्बोर्गीनीतून उतरलेल्या हस्तीचे पाय वळले ते थेट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनाकडे.विखे पाटलांकडे ही हस्ती पाच-दहा मिनिटं वगैरे नव्हे तर तब्बल दोन तास ठाण मांडून बसली होती. त्यामुळे ही अलिशान लम्बोर्गीनी मंत्रालयाच्या पार्किंगमध्ये दोन तास उभी होती.जो येत होता तो या लम्बोर्गीनीकडे पाहिल्याशिवाय पुढे जात नव्हता. कारण पांढऱ्या रंगाची इमारत असलेल्या मंत्रालयात सगळीकडे पांढऱ्या गाड्यांचाच ताफा नेहमीचाच.

Lamborghini in Mantralaya :
CIDCO Lottery 2025: नवी मुंबईत सिडकोचं घर फक्त २५ लाखांत, इतर उत्पन्न गटात किती रुपयांना आणि कुठे घर मिळणार?

.मात्र पांढऱ्या गाड्यांमध्ये ही अलिशान काळी लंबोर्गीनी वेगळी ठरल्यामुळे सर्वांचंच लक्ष ती वेधून घेत होती. आणि त्यामुळेच काळ्या काचा असलेली ही काळी लम्बोर्गीनी मंत्रालयातून संध्याकाळी ५ वाजता गेल्यानंतरही तर्क वितर्क लढवून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं. मात्र त्यानंतर ही अलिशान कार स्काय लाईन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com