tempo fell into canal Saaam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar Accident: हृदयद्रावक! नियंत्रण सुटल्याने टेम्पो कालव्यात कोसळला, वडिलांचा बुडून मृत्यू; चिमुकली गेली वाहून

Tempo Accident News: कालव्यामध्ये बुडून वडिलांचा मृत्यू झाला तर अडीच वर्षांची चिमुकली वाहून गेली आहे. या मुलीचा शोध सुरु आहे.

Priya More

नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) हृदयद्रावक घटना घडली आहे. बाप आणि लेकीचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वरखेड गावाजवळ ही घटना घडली आहे. भरधाव टेम्पो कालव्यामध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar Tempo Accident) पडला. या अपघातामध्ये कालव्यामध्ये बुडून वडिलांचा मृत्यू झाला तर अडीच वर्षांची चिमुकली वाहून गेली आहे. या मुलीचा शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या वरखेड गावाजवळ गंगापूर तालुक्यातील नांदुरमधमेश्वरच्या कालव्यामध्ये टेम्पो कोसळला. कालव्यावरील एस आकाराच्या पुलामुळे वळण न घेतल्याने टेम्पो थेट कालव्यात पडला. या अपघातामध्ये चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर या चालकाची अडीच वर्षांची मुलगी कालव्यामध्ये वाहून गेली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी टेम्पो चालकाचा मृतदेह कालव्याच्या बाहेर काढला तर अडीच वर्षांच्या मुलीचा शोध सुरु आहे. सुधाकर वैराळ असं मृत टेम्पो चालकाचे नाव आहे. तर श्रद्धा वैराळ ही अडीच वर्षांची मुलगी वाहून गेली आहे. जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो कालव्यातून बाहेर काढण्यात आला आहे. या हृदयस्पर्शी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

SCROLL FOR NEXT