Accident Saam tv
महाराष्ट्र

Sangli: डंपरच्या धडकेत पिता-पुत्र ठार; आई गंभीर जखमी

घटनास्थळाचे चित्र पाहून नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहत हाेता.

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या (sangli) इस्लामपूर आष्टा रस्त्यावर (islampur astha road) आज (मंगळवार) सकाळी भरधाव डंपरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत (accident) पिता पुत्र जागीच ठार झाले. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अंकुश शिवाजी साळुंखे (वय ४०), आदित्य अंकुश साळुंखे (वय १४) अशी मृत पिता पुत्रांची नावे आहेत. सोनाली अंकुश साळुंखे (वय ३४) असे जखमी (injured) महिलेचे नाव आहे. (islampur astha accident latest marathi news)

हा अपघात झाल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून मदतकर्य केले सुुरु केले. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अंकुश हे पत्नी आणि मुला समवेत दुचाकीवरून आष्ट्याकडून इस्लामपूरच्या दिशेने निघाले होते. आहिरवाडी फाटा (ahirewadi phata) वळणावर आले असता इस्लामपूरकडून आष्ट्याकडे निघालेल्या भरधाव डंपरने चुकीच्या दिशेने येत अंकुश यांना जोरदार धडक दिली.

चित्र पाहून उडाला नागरिकांचा थरकाप

ही धडक इतकी जोरदार होती की अंकुश व आदित्य दोघे जागेवरच ठार झाले तर सोनाली या गंभीर जखमी झाल्या. हा अपघात झाल्यानंतर देखील डंपर चालकाने डंपर न थांबवता आष्ट्याच्या दिशेने पळविला. या अपघातामधील व्यक्तींना मदत करण्यासाठी नागरिक धावले परंतु घटनास्थळाचे चित्र पाहून त्यांचा थरकाप उडाला.

धडावेगळं झालं डाेकं

आदित्यच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. अंकुश यांच्या धडाला डोकंच नव्हते. त्यामुळे सर्वचजण परिसरात डोक्याचा शोध घेत होते. अंकुश यांचे डोके डंपरच्या चाकात अडकून पुढे गेल्याने ते सापडू शकले नाही. या अपघाताचा तपास पाेलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT