रत्नागिरी : उत्तरप्रदेश (uttar pradesh) येथून दापोलीतील (dapoli) देगाव येथे व्यवसायानिमित्त राहणा-या गंगासागर शुक्ला व त्यांच्या घरमालकांवर २० जणांच्या टोळक्याने हल्ला केल्या प्रकरणी पाेलिसांनी (dapoli police) गुन्हा नाेंद केला आहे. शुक्ला यांच्या घरातील साहित्याचे नुकसान करून त्यांचे घरात असलेले कपडे, काजुबिया जमावाने जाळून टाकून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (dapoli latest marathi news)
घटनास्थळावरुन तसेच पाेलिसांनी दिलेली माहिती अशी : गंगासागर शुक्ला देगाव बौध्दवाडीतील येथील मुकुंद मंडपे यांच्या गोठ्यात राहतात. त्यांनी मंडपे यांचे कडून १२ गुंठे जागा विकत घेतली. तेथे घर (house) बांधण्याचे काम सुरु होते. मात्र हे बांधकम तोडण्यासाठी गावातील जमाव एकत्र आला. गावातल्या लोकांनी गंगासागर शुक्ला यांना लाथाबुक्याने मारहाण केली. तेव्हा शुक्ला यांनी तेथून पळ काढला असता गावक-यांनी त्यांचा पाठलाग करीत ते राहत असलेल्या ठिकाणी गेले. शुक्ला यांच्या घरातील तांदूळ, कांदे, बटाटे, यांची नासधूस केली. शुक्लांची चारचाकी वाहन उलटून टाकले. घरातील कपडे, सुक्या काजू बिया हे वाड्याच्या समोर असलेल्या शेतात डीझेल ओतून जाळून टाकल्या. शुक्ला व त्यांच्या पत्नी या घरमालक मंडपे यांच्या घराच्या माळ्यावर जाऊन लपले त्यामुळे त्यांचा जीव वाचला. तेव्हा काही लोकांनी घरमालक मुकुंद मंडपे यांनाही मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी गंगासागर शुक्ला यांनी दिनेश म्हाळूनकर, रवींद्र भोसले, प्रदीप भोसले, रमाकांत शिंदे, गुरुनाथ मांडवकर, विश्वास पाथरटकर, सुरेश करंजकर, रवींद्र बामणे, विकास बाईत, प्रभाकर गोलांबडे, गंगाराम बाईत, नागेश जाधव, दिलीप जाधव, अनंत जाधव, अनुराधा भोसले, शानू पाथरटकर, सुनील शिवगण, अशोक कदम, चंद्रकांत बामणे व गावातील अन्य २० जणांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपनिरीक्षक निनाद कांबळे करत आहेत. कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देगाव येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.