NAshik CCTV Saam TV
महाराष्ट्र

CCTV Footage : थरार! ओव्हरटेक करुन धडक देत गाडी थांबवली, मग गोळीबार अन् कोयत्याने वार VIDEO

Nashik News : जुन्या वादातून तिघांनी तरुणावर गोळीबार तसेच कोयत्याने वार केले.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

Nashik News : नाशिकमधील सातपूर परिसर गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली. या सिनेस्टाईल हल्ल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

सातपूरच्या कार्बन नाका परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला. जुन्या वादातून तिघांनी तरुणावर गोळीबार तसेच कोयत्याने वार केले. हल्ल्याचा संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद झाला आहे.

तपन जाधव जाधव या तरुणावर हा जीवघेणा हल्ला झाला आहे. सीसीटीव्हीतीली दृष्यांनुसार, संशयित आरोपी आशिष जाधव आपल्या २ साथीदारांसह गाडीतून येत तपनच्या गाडीला त्यांनी धडक दिली. जोरदार धडकेनंतर तपनची कार रस्तावर थांबली. मात्र आपल्यावर हल्ला होणार हे कळाल्यानंतर तपनने गाडीतून उतरुन पळ काढला. (Latest News)

यानंतर तीन हल्लेखोरांनी तपनचा पाठलाग करुन त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केले, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या हल्ल्यात तपन जाधव गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड – चाकण वाहतूक कोंडीविरोधात मोर्चा

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT