Beed News: कांद्याला भाव नसल्यानं कर्ज कसं फेडणार? आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्यानं जीवन संपवलं

बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे ही घटना घडली आहे.
farmer
farmerSaam TV

बीड : कांद्याला मिळत असणाऱ्या कवडीमोल भावाने पुन्हा एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचा बळी घेतलाय. कांद्याला भाव नाही, मग पैसे येणार कसे? पतसंस्थेचे घेतलेले कर्ज फेडणार कसे? आता जगायचं कसं? या विवंचनेत असलेल्या 42 वर्षीय शेतकऱ्याने, गळफास घेऊन आत्महत्या केली. बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे ही घटना घडली आहे. कांतीलाल नारायण गवळी असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

शेतकरी कांतीलाल गवळी यांनी आपल्या दोन एकर शेतात कांदा लागवड केली होती. यासाठी त्यांना मोठा खर्चही आला. आता चांगला भाव लागला तर आपल्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल, असं त्यांना वाटत होतं.

मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे आपण घेतलेले कर्ज कसं फेडावं? या विवंचनेतून शेतकरी कांतीलाल गवळी यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

farmer
Admapur News: 'गर्वाने वागू नका! भारत-पाक युद्ध होईल, चालता बोलता मरण येईल, राज्य गुंडांचे येईल...' बाळूमामांच्या भंडाऱ्यात भाकणूक

दरम्यान यामुळे पुन्हा एकदा शेतमालाला भाव नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये असलेल्या नैराश्येचं वास्तव समोर आलं आहे. यामुळे मायबाप सरकारने शेतमालाच्या हमीभावावर तोडगा काढावा. शेतकऱ्यांना मानाने जगता येईल तेवढा तरी शेतमालाला भाव द्यावा. तरचं शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com