Admapur News: 'गर्वाने वागू नका! भारत-पाक युद्ध होईल, चालता बोलता मरण येईल, राज्य गुंडांचे येईल...' बाळूमामांच्या भंडाऱ्यात भाकणूक

राज्य गुंडांचे येईल, महागाईचा भस्मासूर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल, ऊन्हाळ्याचा पावसाळा होईल, अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल..
Balumama Bhaknuk
Balumama Bhaknuk Saamtv
Published On

Balumama Bhaknuk: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूरमध्ये (Aadmapur) बाळूमामा देवालयात जागर उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवामध्ये राज्यभरातील लाखो भावी उपस्थित राहतात. उत्सवानिमित्त मंदिर परिसरात भाकणूक केली जाते. ही भाकणूक ऐकण्यासाठी भाविक पहाटेपासूनच मंदिर परिसरात गर्दी करत असतात.

भंडाऱ्याची उधळण करत 'बाळूमामाच्या (Balumama) नावानं चांगभलं' चा जयघोष करत या भाकणूकीला सुरुवात होते. देवालयात जागरानिमित्त आज रविवारी (19 मार्च) पहाटे कृष्णात डोणे- वाघापूरकर यांची भाकणूक पार पडली. यावेळी विविध सामाजिक, आर्थिक, राजकीय तसेच आंतरराष्ट्रीय मुद्यावर भाष्य करण्यात आले. (Latest Marathi News)

Balumama Bhaknuk
Pankaja Munde: 'आता निवडणुका घ्याचं...' पंकजा मुंडेंनी आवळली वज्रमूठ; थेट देवेंद्र फडणवीसांवर साधला निशाणा

भाकणूकीत काय काय सांगितलं?

जगातील राष्ट्रे लढाई करतील, तिसरं महायुद्ध होईल, युद्धाचा भडका उडेल, भारत पाकिस्तानचं छुपं युद्ध होईल. चीन राष्ट्र भारतावर आक्रमण करेल, भारतीय सैनिक त्यांना परतून लावतील. तिरंगा झेंडा आनंदात राहील. कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल, दीड महिन्याचे धान्य उदंड पिकंल, तांबडी रास मध्यम पिकेल.

ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल, वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्यांची व वैरणीची चोरी होईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल, ऊसाचा काऊस होईल, साखरेचा भाव तेजीत राहील, ऊसाच्या कांड्याने व दुधाच्या भांड्याने राज्यात गोंधळ उडेल,मायेचं लेकरु मायेला ओळखायचं नाही.

मी- मी करु नका गर्वाचे घर खाली...

गर्वाचे घर खालीच होईल, होईल होईल भुकूंप होईल, जंगलातील प्राणी गावात येईल, गावातील माणूस जंगलात जाईल,बारा बाजार मोडून एक बाजार होईल,समुद्रातील संपत्तीचा नाश होईल, आदमापूर हे गाव प्रतिपंढरपूर होईल, बाळूमामांची करशिला सेवा तर खाशीला मेवा, बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन.राजकीय नेते कोलांटउड्या मारतील.

माझं माझं म्हणू नका, माणसाला माणूस खाऊन टाकील,येतील येतील लाकडाची डोरली येतील,तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल, राज्य गुंडांचे येईल, महागाईचा भस्मासूर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल, ऊन्हाळ्याचा पावसाळा होईल, अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल..

Balumama Bhaknuk
IND vs AUS 2nd ODI : मिशेल स्टार्कने टीम इंडियाचं कंबरडं मोडलं, दुसऱ्या वनडेत भारत 117 वर ऑलआऊट!

पैसा न खाणारा नेता शोधून सापडणार नाही...

सत्ता संपत्तीच्या मागे धावतील, सत्तेच्या बाजारात राजकीय नेता विकत मिळेल. पैसा न खाणारा राजकीय नेता शोधून सापडणार नाही .राजकारणात मोठा गोंधळ होईल. राज दरबारी मोठा दंगा धोपा होईल. राजकीय नेते मोठ्या घोटाळ्यात अडकून पडतील. तुरुंगात जातील. 2023 सालात राजकीय नेते उड्डाण मारतील. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा सिंहासन डळमळत राहील. महाराष्ट्रात छोटे पक्ष राजकारणात आघाडी घेतील. राजकारणात उलथापालथ होईल.

साखर सम्राटांची खुर्ची डगमगणार...

साखरेचा भाव तेजी मंदीत राहील.गुळाचा भाव उच्चांकी राहील.साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. मनेजर आनंदी राहील. उसाचा दर चार हजारांवर जाईल.उसाचा काऊस होऊन रस्त्यावर पडेल. उसाच्या कांड्यांचा दुधाच्या भांड्यानं राज्या-राज्यात गोंधळ निर्माण होईल. व्यापारी वर्ग शेतकऱ्याची मोठी लुबाडणूक करेल. शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com