Pankaja Munde: 'आता निवडणुका घ्याचं...' पंकजा मुंडेंनी आवळली वज्रमूठ; थेट देवेंद्र फडणवीसांवर साधला निशाणा

Maharashtra Politics: तुमच्या आणि माझ्या संघर्षाला सोन्याचे दिवस येतील. आपण आपला हक्क हात आपटून घेऊ, असे आवाहन पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना केली आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeSaam tv

विनोद जरे...

Beed News: शिंदे सरकार निवडणुकांपासून लांब पळत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेते करत असतानाच भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांनीही आता निवडणुका घ्याच असं आव्हान दिले आहे. "कार्यकर्त्यांनो कामाला लागा. तुमच्या आणि माझ्या संघर्षाला सोन्याचे दिवस येतील. आपण आपला हक्क हात आपटून घेऊ," असं म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी निवडणुकीसाठी वज्रमुठ आवळली आहे. (Latest Marathi News)

Pankaja Munde
IND vs AUS 2nd ODI : मिशेल स्टार्कने टीम इंडियाचं कंबरडं मोडलं, दुसऱ्या वनडेत भारत 117 वर ऑलआऊट!

भारतीय जनता पार्टीचे बूथ सशक्तीकरण, जिल्हा प्रशिक्षण वर्ग व जिल्हा कार्यकारिणीची बैठक मुंडे यांनी घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना "मुंडे साहेबांसारख करणं, त्यांची कॉपी करणे, यामुळे कोणीही मुंडे होत नाही तर त्यांच्या विचाराचे अनुकरण करून वागणं म्हणजे मुंडे साहेब आहे," असं म्हणत नाव न घेता भाऊ धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) पंकजा मुंडे यांनी निशाणा साधला.

फडणवीसांवरही साधला निशाणा...

तसेच यावेळी बोलताना त्यांनी "मठातला एखादा माणूस जवळ घेऊन लोकं जवळ आले, असा अविर्भाव आणू शकत नाही, लोक हे त्याच्या जवळ येऊ शकत नाहीत कारण त्याच्या मनामध्ये स्वार्थ आहे, "असं म्हणत बीडच्या गहनीनाथ गडावर आलेल्या देवेंद्र फडणवीसांवरही (Devendra Fadanvis) पंकजा मुंडेंनी सडकून टीका केली.

Pankaja Munde
Bangladesh Accident : बांगलादेशमध्ये भीषण अपघात! भरधाव बस दरीत कोसळली; 17 प्रवाशांचा मृत्यू, 30 जण जखमी

भाजपलाच दिला घरचा आहेर...

तसेच यावेळी बोलताना "त्यांनी निवडणुकाच होईना नगरपालिका होत नाही, जिल्हा परिषद होत नाहीत, मात्र ग्रामपंचायत होत आहेत, मला असं वाटतंय गावागावात युद्ध तयार झालंय, मात्र पुढे नाही," असं म्हणत निवडणुकांवरून पंकजा मुंडे यांनी भाजपला आता घरचाच आहेर दिला आहे. (Maharashtra Politics)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com