तड तड तड तड....गौतमीचा आतापर्यंतचा सगळ्यात खतरनाक डान्स; Video Viral

गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम म्हटला की त्या परिसरात तिच्या चाहत्यांनी गर्दी हमखास होणार हे समीकरण सध्या तयार झालंय.
Gautami Patil
Gautami Patil Saam TV

Gautami Patil Dance : गौतमी पाटीलची आता वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. गौतमी पाटीलने कमी वेळेत मनोरंजन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही वादांमुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या गौतमीची लोकप्रियता सध्या शिगेला पोहचली आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत अनेकांना गौतमीची भुरळ पडते.

लावणी डान्सर  गौतमी पाटील राज्यभर डान्सचे कार्यक्रम करत असते. गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम म्हटला की त्या परिसरात तिच्या चाहत्यांनी गर्दी हमखास होणार हे समीकरण सध्या तयार झालंय. त्यामुळे गौतमी पाटील आणि तिचे डान्स कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतात. गौतमीचा असाच एक तड तड तड... गाण्यावरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Gautami Patil
Gautami Patil: शिंदेशाहीलाही गौतमीची भुरळ! आदर्श- उत्कर्ष शिंदेच्या आगामी गाण्यात थिरकणार 'सबसे कातिल गौतमी पाटील'

गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. पाटलांचा बैलगाडा, चंद्रा, सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम... अशी विविध गाण्यावरील गौतमच्या डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. (Entertainment News)

Gautami Patil
Special Report : जिकडे तिकडे गौतमीचा Swag , Gautami Patil चे Poster पाहून आजोबांनाही पडली भुरळ!

गौतमी पाटीलचे अनेक फॅन पेज सध्या फेसबूक, इन्स्टाग्राम, यू्ट्युबरवर उपलब्ध आहेत. या माध्यमाध्यमातून गौतमीचे अनेक डान्स व्हिडीओ तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचत असतात. मात्र एका वादापासून चर्चेत आलेल्या गौतमीने राज्यभरात मार्केट खरंच जाम केलंय, असंच म्हणावं लागेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com