Sambhajinagar Accident News saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Accident News: सोलापूर -धुळे महामार्गावर भीषण अपघात, रस्ता ओलांडत असताना 3 जणांना भरधाव ट्रकने चिरडले; दोघांचा मृत्यू

Accident News Marathi: हा भीषण अपघात घटना आडगाव जवळ घडला आहे.

Shivani Tichkule

नवनीत तापडिया

Accident News Today: धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रस्ता ओलांडत असताना तीन जणांना भरधाव ट्रकने चिरडले असून त्यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आडगाव जवळ घडली. (Latest Marathi News)

या भीषण अपघातात (Accident) पिंटूसिंग राजपूत, गजानन मोहिते या दोघांचा मृत्यू झाला असून कमलेशसिंग राजपूत हा गंभीर जखमी आहे. हे सर्वजण आडगाव परिसरात एका ठेकेदाराकडे कामाला होते.

रस्ता ओलांडत असताना हा भीषण अपघात झालेला आहे. गेल्या महिन्यात अशाच पद्धतीने गुजरातमधील चार भावंडांचा समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर तर एक मृत्यूची झुंज देत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अपघाताचे प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा शिवसेनेला जोरदार धक्का; २००पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai : एका दिवसात मुंबई दर्शन! 'ही' ७ ठिकाणं पाहिलीत तर दिवस बनेल खास

भर मंडपात नवरदेवासह नातेवाईकांना डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न! प्रेमविवाहाचा असा बदला पाहून हादरून जाईल मन

Maharashtra News Live Update: जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य

First car service: नवी कार घेतल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग कधी केली पाहिजे?

SCROLL FOR NEXT