Jalna Accident Saam Tv
महाराष्ट्र

Jalna Accident: जालन्यात समृध्दी महामार्गवर वाहनाचा टायर फुटून भीषण अपघात; ४ जण जखमी

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलं आहे.

लक्ष्मण सोळुंके

Samruddhi Mahamarg Accident News:  गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. दररोज समृद्धी महामार्गावर किरकोळ आणि भीषण अपघात होत आहे. एकीकडे महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने गांधीगिरी सुरू केली असताना, दुसरीकडे समृद्धी महामार्गावर टायर फुटून आणखी एक भीषण अपघात झाला आहे. (Breaking Marathi News)

समृध्दी महामार्गावर टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून (Nashik) यवतमाळच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचा समोरील टायर अचानक फुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने ही गाडी समृध्दी महामार्गाच्या रस्त्याच्या मधोमध जाऊन थाबली. टायर फुटला तेव्हा गाडीमध्ये चार जण प्रवास करीत होते मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात चौघेही किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी क्रेनच्या मदतीने गाडी बाजूला करत समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली. या अपघातात रितेश धात्रक, प्रिय ठाकूर, योगेश ठाकूर, श्लोक परदेशी हे प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.(Maharashtra News)

माजी रणजीपटू जखमी, पत्नीचा मृत्यू

दरम्यान, याच समृध्दी महामार्गावर मंगळवारी (१८ एप्रिल) नागपूरचे माजी रणजीपटू आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे माजी क्युरेटर प्रवीण हिंगणीकर हे जखमी झाले. या अपघातात प्रवीण हिंगणीकर यांच्या पत्नी या जागीच ठार झाल्या. हा अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशा चुराडा झाला.

प्रवीण हिंगणीकर यांना अपघात झाल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हाताला व पायाला जखमा झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी अपघात व बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT