Farmers should use home grown soybean seeds says eknath dawale Saam Tv
महाराष्ट्र

शेतकऱ्यांवर बोगस बियाण्यांचे संकट; कृषी विभागाच्या प्रधान सचिवाने केले 'हे' आवाहन

लातूरसहित राज्यातील अनेक जिल्ह्यातून दरवर्षी बोगस बियाणांच्या तक्रारी वाढताना दिसून येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

लातूर : लातूर हा सोयाबीन (soybean) उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख आहे. मात्र, लातूरसहित राज्यातील अनेक जिल्ह्यातून दरवर्षी बोगस बियाणांच्या तक्रारी वाढताना दिसून येत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल राज्याच्या कृषी विभागाने घेतली आहे. गेल्या वर्षी राज्यात कंपन्यांवर विविध ठिकाणी ८४ ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच बाजारातील बोगस बियाणे न वापरता त्याऐवजी शेतकऱ्यांनी घरातील सोयाबीनचे बियाणे वापरावे, असे आवाहन राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केले. लातूर (Latur ) जिल्ह्यातील औसा तालुक्यातील नागरसोगा येथे मनरेगातून ग्राम समृध्दी कार्यशाळेत बोलताना सांगितले आहे. (Farmers should use home grown soybean seeds says eknath dawale )

हे देखील पाहा -

आज लातूरच्या औस तालुक्यातील नागरसोगा इथ क्रिएटिव्ह फाऊंडेशनद्वारा मनरेगातून ग्राम समृध्दी कार्यशाळा आयोजित करण्यात आला आली. यावेळी राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. 'दरवर्षी सोयाबीन बोगस बियाणांच्या तक्रारी येत असतात. गेल्यावर्षी एक लाखांच्या जवळपास तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळं महाबिजचे सोयाबीन बियाण शेतकऱ्यांना बदलून देण्यात आले होते तर अन्य कंपन्यांवर राज्यात विविध ठिकाणी ८४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच बाजारातील बोगस बियाणे न वापरता त्याऐवजी शेतकऱ्यांनी घरातील सोयाबीनचे बियाणे वापरावे, असे आवाहन कृषी विभागाचे प्रधान सचिव डवले यांनी केले.

दरम्यान, नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेवून शेतकऱ्यांच्या खत आणि बियाणांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या खत आणि बियांणाच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्याबाबात कोणतीही तडजोड करू नका, असे आदेश देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे डवले यांनी सांगितले. तसेच यंदाच्या वर्षी खत आणि बियाणांच्या तुटवडा भासणार नाही, असंही डवले यांनी सांगितले. सोयाबीनच्या बोगस बियाण्याने नुकसान होऊ नये, त्यासाठी शेतकऱ्यांनी घरातील सोयाबीन बियाणे वापरावे, असे आवाहन देखील डवले यांनी केले आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT