Farmers Protest Saam Digital
महाराष्ट्र

Farmers Protest: 'स्वाभिमानी'ने रोखली साताऱ्यात कृष्णा साखर कारखान्याची वाहने , ऐन दिवाळीत शेतकरी संघटना आक्रमक

Farmers Protest: कराडमध्ये ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ऐन दिवाळीत आक्रमक झाली असून साताऱ्यातील कृष्णा साखर कारखान्याची वाहने रोखली आहेत. तर वाठार- रेठरे मार्गावर ऊसाचे ट्रॅक्टर रोखले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Farmers Protest

कराडमध्ये ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ऐन दिवाळीत आक्रमक झाली असून साताऱ्यातील कृष्णा साखर कारखान्याची वाहने रोखली आहेत. तर वाठार- रेठरे मार्गावर ऊसाचे ट्रॅक्टर रोखले आहेत. या पार्श्वभूमीवर कराडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एफआरफीचे ४०० रुपये देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटेकडून कोल्हापूर सांगलीत जनआक्रोश यात्रेची सुरुवात केली आहे. दरम्यान साखर कारखानदारांनी अद्याप एफआरपीची रक्कम देण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे आंदोलन चिघळले असून महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटत आहेत.

सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील वर्षाचे 400 रुपये आणि चालू एफआरपी 3 हजार 500 रुपये जाहीर न करताच साखर कारखाने सुरू केले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून कराड तालुक्यातील वाठार - रेठरे आणि कराड - चांदोली मार्गावर ऊसाची वाहने रोखली आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनास्थळावर कराड तालुका पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजू शेट्टी यांनी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कारखान्यांना ऊस पाठवणार नाही, असा इशारा दिला आहे. दरम्यान कोल्हापूरमध्ये नुकताच कारखानदारांच्या घरी जाऊन खर्डा-भाकरी आंदोलन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राजाराम कारखान्याचे चेअरमन आणि आमदार अमल महाडिक यांच्या निवास्थानी खर्डा भाकरी देण्यात आली. तसेच कारखान्याचे माजी चेअरमन महादेवराव महाडिक यांनीही आंदोलकांसोबत खर्डा भाकरी खाऊन चर्चा केली. तसेच कार्यकर्त्यांनाही भरवली होती. या अनोख्या आंदोलनाची राज्यात चांगलीच चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

Nanded Accident : गणेश भक्तांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

Mumbai Konkan Ro Ro Ferry : तळकोकणात पोचा अवघ्या पाच तासात; आता मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा, VIDEO

Numerology: सप्टेंबर महिना 'या' मूलांकासाठी ठरेल लकी, स्वप्न होतील पूर्ण

Netflix Trending Films: नेटफ्लिक्सवर ट्रेंड होताहेत 'हे' सुपरहिट चित्रपट; भारतीय सिनेमाचांही समावेश, वाचा यादी

SCROLL FOR NEXT