Drought In Beed: दुष्काळजन्य परिस्थितीचं भीषण वास्तव; माजलगाव धरणात अवघा ७.८२% पाणीसाठा

Beed: बीड जिल्ह्यातील मुख्य जलक्षेत्र असलेल्या माजलगावच्या धरणात अवघा ७.८२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामूळे भीषण पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे.
Drought In Beed
Drought In BeedSaam TV
Published On

विनोद जिरे

Beed News:

राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्सवर साजरा होत असताना अचानक काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. एकीकडे मध्येच आलेल्या पावसाने काही ठिकाणी शेतीपिकाचे नुकसान झालेय. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यावर पाणी टंचाईचे भीषण सावट पसरले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Drought In Beed
Koyna Dam Water : आमदारांची शिष्टाई, मंत्र्यांचा हाेकार, आजच्या आज काेयनेच्या पाणी सांगलीकरांना मिळणार

जायकवाडी धरणातील पाण्यावर बीड, माजलगाव शहरे अवलंबून आहेत. पाणी टंचाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. बीड जिल्ह्यातील मुख्य जलक्षेत्र असलेल्या माजलगावच्या धरणात अवघा ७.८२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामूळे भीषण पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे.

माजलगाव धरणातून बीड शहर, माजलगाव शहर व परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी पाणीपुरवठा केला जातोय. त्यामुळे माजलगाव धरणात जायकवाडी धरणातून कॅनल द्वारे पाणी सोडावे अशी मागणी केली जात आहे. तसेच आगामी काळात पाणी टंचाईमुळे परळी औष्णिक विद्युत केंद्र बंद ठेवावे लागते की काय? अशी परिस्थितीही निर्माण झाली आहे.

राज्यात बीडसह अन्य ठिकाणी देखील पाणीटंचाईच्या समस्या उद्भवल्या आहेत. दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी माजी कृषिमंत्री आणि सध्याचे पंणनमंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी आज सिल्लोडमध्ये मोर्चा काढला. आठवडाभरापूर्वी राज्यातील दुष्काळ जाहीर करताना मराठवाड्यातील १४ तालुक्यांचा गंभीर दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आला होता.

त्यात सिल्लोड तालुक्याचा समावेश केला नसल्याचा निषेधार्थ आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. आता त्या पार्श्वभूमीवर काल राज्य सरकारने आणखी काही मंडळे दुष्काळ यादीत टाकली आहेत. त्यात सिल्लोड तालुक्यातील सर्वच महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Drought In Beed
Water Issue : नाशिक, अहमदनगर विरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता, आज महत्त्वाची बैठक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com