सचिन कदम, प्रतिनिधी
एकीकडे दिवाळीची धामधुम सुरू असतानाच राज्यात अवकाळी पावसाची एन्ट्री झालीय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काल राजधानी मुंबईसह, पुणे, ठाणे, कल्याण, रायगड तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस कोसळत असून बळिराजाचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सलग चार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने रायगडमधील (Raigad Rain) शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसामुळे कापलेल्या आणि कापणी योग्य भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणी झालेले भाताचे भारे शेतातच पडून राहिल्याने भिजून गेले.
नुकसान कमी करण्यासाठी भिजलेले भाताचे पिक वाळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाताचे पिक हातात येण्याची वेळ असतानाच निसर्गाने दगा दिला आहे. हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे दिवाळीच्या आनंदावर विर्जन पडले आहे. (Latest Marathi News)
. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, पुढील चार दिवसही अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार आहे. येत्या ४८ राज्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी शेतीपिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Updates)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.