Farmers block Pune-Bangalore highway at Shiroli Naka in Kolhapur, led by Raju Shetti, opposing the Shaktipeeth Expressway land acquisition. Saam tv
महाराष्ट्र

Shaktipeeth : सरकारच्या शक्तिपीठविरोधात शेतकऱ्यांची 'शक्ती'; कोल्हापूर, सोलापूरसह १२ जिल्ह्यांमध्ये चक्काजाम

Nagpur to Goa Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यातील १२ जिल्ह्यांतील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. कोल्हापूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी जमिनीच्या अधिग्रहणाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

Namdeo Kumbhar

Shaktipeeth Expressway Latest News Today : नागपूर ते गोवा या मार्गावर होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात १२ जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा तिव्र विरोध होत आहे. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध नोंदवलाय. त्या पार्श्वभूमीवर आज १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी महामार्ग रोको आंदोलन करण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाडा अन् पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाँणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. प्रस्तावीत शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सर्व १२ जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून आज सरकारला शेतकरी आपली ताकद दाखवणार आहेत. कोल्हापुरातील आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी सहभागी होणार आहेत. (Shaktipeeth Mahamarg News)

कोल्हापूरमध्ये शक्तिपीठला तीव्र विरोध, राजू शेट्टी मैदानात

आज कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने पुणे - बेंगलोर महामार्ग अडवून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाहनांवर दगडफेक होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवलेली आहे. आंदोलन सुरू होण्यापूर्वी ही वाहतूक वळवण्यात येणार असून आंदोलन संपल्यानंतर पुणे - बेंगलोर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता या आंदोलनाला पुणे - बेंगलोर महामार्गावरील शिरोली नाका इथं या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. कोल्हापूर सोबतच इतर जिल्ह्यातील शेतकरी देखील त्या त्या जिल्ह्यात महामार्ग रोको, चक्काजाम आंदोलन करणार आहेत.

सोलापूर-धाराशिवमध्येही विरोध -

शक्तिपीठ महामार्गाला धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात विरोध वाढला आहे. महामार्ग रद्द करावा यासाठी धाराशिवमधील १० गावांनी ठराव घेतले आहेत. उर्वरित नऊ गाव दोन दिवसात ठराव घेणार आहेत. शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची माहिती देण्यात आली. शक्तिपीठ महामार्ग विरोधात रस्त्यावर आणि संविधानात्मक लढाई सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या दौऱ्यानंतर विरोधाची धार वाढली आहे.

शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध -

शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्ग प्रकल्प आहे. नागपूर ते गोवा असा ८०२ किमी लांबीचा सहापदरी मार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या विभागांना जोडून पर्यटन, व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचा सरकारचा मानस आहे. पण या महामार्गाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. परभणी, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरसह १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध केला जात आहे.

शेतकऱ्यांचा विरोध का आहे ? Why are Maharashtra farmers protesting against Shaktipeeth Expressway

वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड,परभणी,बीड,लातूर,धाराशिव (उस्मानाबाद), सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग केले. हा महामार्ग सुमारे 7,500 ते 27,000 हेक्टर सुपीक आणि बागायती जमिनी अधिग्रहित करणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. शेतकरी आपली वडिलोपार्जित जमीन गमावण्याच्या भीतीने आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

Bala Nandgaonkar : 'उद्धव ठाकरे आणि साहेबांनी आता एकत्र यावं', बाळासाहेबांच्या सैनिकाचे भावनिक उद्गार

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस; रिंकू राजगुरू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन

SCROLL FOR NEXT