shivednrasinhraje bhosale  
महाराष्ट्र

सरसकट बंदी याेग्य नाही, मी सरकारशी बाेलेन; शिवेंद्रसिंहराजे

ओंकार कदम

सातारा : राज्यात बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह विराेधी पक्ष नेत्यांना भेटून मागणी केली जाईल. या शर्यतींमध्ये शेतकरी वर्गच सहभागी हाेत असताे येथे कुणी व्यावसायिक सहभागी हाेत नाही. या शर्यतींचे ग्रामीण भागाशी एक वेगळं नाते असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले shivednrasinhraje bhosale यांनी नमूद केले.

पेटा peta संस्थेने याचिका दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती थांबल्या आहेत. तेव्हा पासून शेतकरी या शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी धडपड करत आहेत. परंतु राज्य शासनाने शर्यती सुरु करण्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बैलगाडी शर्यत संघटना आता आक्रमक झाली आहे.

या शर्यती सुरु कराव्यात अशी मागणी आज (रविवार) सातारा-जावळीमधील बैलगाडा शर्यत संघटनेच्या माध्यमातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. त्यावेळी सुरुची बंगला येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी संघटनेच्या पदाधिका-यांना हा प्रश्न सरकार दरबारी मांडला जाईल असे आश्वासित केले.

यावेळी आमदार भाेसले म्हणाले पुर्वी बैलगाडा शर्यती हाेत असे. पेटा संस्थेच्या याचिकेनंतर काही निर्णय झाले आहेत. त्यामुळे या शर्यती थांबल्या आहेत. खरंतर बैलगाडी शर्यती या ग्रामीण भागाशी जाेडलेला प्रकार आहे. बैलांना फार जपण्याचे काम शेतकरी करीत असताे. शेतक-यांची मुले अशा शर्यती भाग घेतात. त्यामुळे शेतकरी वर्ग बैलांना आपल्या मुलांप्रमाणेच वाढविताे. ताे काही बैलांवर अमानुष अत्याचार करीत नाही.

बैलगाडी शर्यत ही मनाेरंजनाची गाेष्ट आहे. यात्रांमध्ये जसा तमाशा हाेताे तसेच या शर्यती हाेतात. हजाराे लाेक बैलगाडी शर्यती पाहयला यायची. हे एक आकर्षण असते. या ठिकाणी बक्षीसं लावलेली जात.

सगळीकडं बैलांवर अत्याचार हाेताे असं नाही, कूठ तरी एखादी घटना घडली असेल पण सरसकट शर्यतींवर बंदी लागू करणे हे याेग्य नाही. सर्वाेच्च न्यायालयात याबाबत सुनावणी हाेईलच पण बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेणार आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

SCROLL FOR NEXT