काेल्हापूर : रविवारची सकाळ. रस्त्यावरुन लहान पाेरांपासून युवकांचा एकच कल्लाेळ हत्ती आलाय हत्ती, अरं पळ ते बघ हत्ती आलाय. हाेय! आज सकाळपासून आजारा तालुक्यातील काही गावांमध्ये हत्तीचा मुक्त संचार सुरु हाेता आणि आत्ता दुपारी एक पर्यंत त्याच्या मागे मागे अनेकजण ताे कूठे जाताेय हे पाहण्यासाठी सकाळपासून फिरत आहे. दरम्यान या हत्तीला तातडीने पकडून पुन्हा जगंलात साेडा अशी मागणी स्थानिकांची आहे.
एक जंगली हत्ती सकाळी खाेरटावाडी येथील एका काजूच्या कारखान्यानजीक बराच वेळ थांबून हाेता. त्याने भादवण, खाेराटवाडी येथे आपला मुक्त संचार सुरु ठेवला आहे. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी रवाना झाले आहेत. त्याच्या हालचालींवर नजर ठेवून आहेत. वनविभागाला स्थानिक युवक मदत करीत आहेत.
मुक्त संचार करीत असलेल्या हत्तीचे अनेक जण छायाचित्रण करीत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानूसार सकाळपासून हत्ती फिरत आहे wild elephant enters in ajaara kolhapur. हत्तीने खेडे गावातील हिरण्यकेशी नदी पार केली. हाजगाेळी गावात पाेहचला हाेता.
सध्या हत्तीने साेहाळेच्या दिशेने जात असल्याचे युवकांनी सांगितले. हा हत्ती पुन्हा त्याच मार्गाने परतेल असे काहींना वाटत आहे. एकदंरीतच हत्तीच्या मुक्त संचाराने आजरा तालुक्यातील खाेराटवाडी, भादवण या गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काही माध्यमांच्या प्रतिनिधी यांनी देखील जाेखीम पत्करत हत्तीचे छायाचित्रण केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.