Agriculture Fraud saam tv
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना धक्का! लिंबू ऐवजी झाडाला लागले ईडलिंबू, कृषी विज्ञान केंद्राकडूनच फसवणूक झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार

Agriculture Fraud: वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील कुपटा येथील शेतकरी विजय देशमुख यांना एका धक्कादायक प्रकाराचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Dhanshri Shintre

वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील कुपटा येथील शेतकरी विजय देशमुख यांना एका धक्कादायक प्रकाराचा सामना करावा लागला आहे. पाच वर्षांपूर्वी कृषी विज्ञान केंद्र, करडापासून त्यांनी साई सरबती जातीच्या लिंबाच्या ३८५ रोपांची खरेदी केली होती. यासाठी त्यांनी तब्बल पाच ते सहा लाख रुपये खर्च केले आणि मोठ्या मेहनतीने दोन एकर क्षेत्रावर लिंबाच्या बागेची लागवड केली होती.

शेतकरी विजय देशमुख यांनी सांगितले की, २४ जून २०२० रोजी केव्हीके करडा यांच्याकडून हट्टी शेतशिवारातील दोन एकर जमिनीत साई सरबती लिंबाच्या कलमांची लागवड केली. देशमुख यांनी या बागेची विशेष काळजी घेतली, झाडांना योग्य वाढ व त्यांची फळधारणा सुनिश्चित केली. मात्र, यावर्षी जेव्हा झाडांना फळ येण्याची वेळ आली, तेव्हा विजय देशमुख यांना आश्चर्याचा सामना करावा लागला. त्यांना समजले की, लिंबाच्या झाडांवर लिंबाच्या ऐवजी ईडलिंबू (नींबू) फळं लागली आहेत.

यामुळे ते खूपच निराश झाले आणि त्यांनी कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्राकडे तक्रार केली. यावर आजवर काहीही उत्तर न मिळाल्याने ते हतबल झाले आहेत. देशमुख यांनी या बागेसाठी पाच वर्षे कठोर परिश्रम घेतले होते, परंतु आता जेव्हा फळांचं प्रकारच बदलले आहे, तेव्हा त्यांना मोठा आघात बसला आहे.

या बागेवरील खर्च आणि भविष्यात २० ते २५ वर्षांतील उत्पादनाचा विचार करता, विजय देशमुख यांनी कृषी विज्ञान केंद्राकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, केंद्राच्या फसवणूकामुळेच त्यांच्या मेहनतीला वाया गेले आहे. शेतकरी विजय देशमुख यांच्या या तक्रारीवर वेगळी कारवाई होईल का, यावर कृषी विभागाचे उत्तर अवलंबून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT