Farmers agitation  Saam Tv
महाराष्ट्र

Karjat Farmers News: कर्जतमधील इथेन गॅस प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक; तहसील कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार

Karjat Farmers News: शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. येत्या २६ आँक्टोबर २०२३, कर्जत तलहिस कार्यालयाबाहेर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत.

Vishal Gangurde

karjat News:

गेल्या ५ वर्षापासून कर्जत तालुक्यातील निकोप, अवसरे, बिरदोले, कोदिवले, दहिवली, वंजारपाडा, तळवडे, पिंपळोली, वाकस, नसरापूर, गणेगाव, कडाव, मार्केवाडी, सालवड कर्जत या गावातील रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

जमिनीच्या मोबादल्यासाठी या प्रकल्पग्रस्तांकडून कायदेशीर मार्गाद्वारे प्रयत्न सुरू आहेत. या रिलायन्स प्रकल्प अधिकारी, सक्षम प्राधिकारी आणि शासन दरबारी असलेला हा विषय अजूनही निकाली निघत नाही, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रकल्पग्रस्त शेतकरी हे कर्जत तलहिस कार्यालयाबाहेर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. (Latest Marathi News)

'रिलायन्सने शेतकऱ्यांची फसवणूक केली. इथेन गॅस पाइपलाईनचे काम होईपर्यत अर्धवट मोबदला देऊन काम होताच कंपनीने शेतकऱ्यांना मंजूर केलेला मोबदला न देताच पळ काढला. जमीन अधिग्रहीत करण्यासाठी कंपनीने खोटे पंचनामे, अर्धवट मोबदला, शेतीची कोणतीही बांध बंदिस्ती न करताच गाशा गुंडाळून गेले, असं प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, कर्जत येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी याआधी साखळी उपोषण, उद्रेक आंदोलन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, महसूलमंत्री या सर्वांना अनेकदा पत्रव्यवहार करत बैठकाही घेतल्या आहेत. परंतु कोणातही मार्ग निघाला नसल्याची माहिती आहे.

६ जुलै रोजी रायगडचे विद्यमान पालकमंत्री आणि मंत्री उदय सांमत यांच्या मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानीही बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच यास रिलायन्स प्रशासन, सक्षम प्राधिकारी, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी, तहसिलदार आदी सर्व उपस्थित होते. यावेळी सर्व शेतकऱ्यांचे पुन्हा जमिनीची पंचनामे करण्याचे आदेश दिले होते, तरीही कोणतीच हालचाल पुढे दिसून आली नाही, असंही प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं आहे.

आमरण उपोषणाचे नेतृत्व करणारे शेतकरी केशव तरे म्हणाले की, आम्ही गेल्या ५ वर्षापासून सनदशील आणि लोकशाही मार्गाने पाठपुरावा करतो आहे. रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पात दलाल मोठे झाले. पंरतू ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी अधिग्रहीत झाल्या. ते मात्र आजही मोबदल्यासाठी लढत आहेत. आमचा आजही प्रशासनावर विश्वास असून तेच यातून मार्ग काढतील. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे'.

'उपोषणाच्या माध्यमातून आमचा आवाज रिलायन्स प्रशासन आणि सरकार यांच्यापर्यत पोहचावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही एकच मागणी आहे. जर आमच्या जमिनीचा मोबदला देणार नसाल तर आमच्या ७/१२ वरील रिलायन्स इथेन गँस प्रकल्पाचा ठप्पा त्वरीत हटवावा आणि आमच्या जमिनीतील पाइपलाईन त्वरीत काढून टाकावी, असे ते म्हणाले.

तसेच, या उपोषणादरम्यान काहीही अनिचित प्रकार घडला, तर यास कंपनी प्रशासन जबाबदार राहील. आता, न्याय मिळेपर्यत शेतकरी मागे हटणार नाही,असे केशव तरे यांनी निर्धार व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT