Ravikant Tupkar, Buldhana Saam Tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar On Onion Export Duty: ...अन्यथा दिल्लीतील वाणिज्य मंत्र्यांच्या घरात कांदा फेकणार, कांदाप्रश्नी रविकांत तुपकरांचा इशारा

Buldhana Ravikant Tupkar Press Conference: केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे.

Priya More

Buldhana News: राज्यातील कांद्रा प्रश्न (Onion Issue) चांगलाच पेटला आहे. केंद्र सरकारने (Central Government) टोमॅटोप्रमाणेच कांद्याचे भाव (Onion Rate) वाढू नये म्हणून कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारणीचा (Onion Export Duty) निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी आणि विरोधी पक्षनेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेते रविकांत तुपकर (Farmer Leader Ravikant Tupkar) आक्रमक झाले असून त्यांनी थेट वाणिज्य मंत्र्यांनाच इशारा दिला आहे.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आणण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्के लावला असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. शेतकऱ्याला मारण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. एकीकडे सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी मरतोय तर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मरणावर सरकार टपले आहे.

जर ४ दिवसांत केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीलवर लागू केलेले ४० टक्के निर्यात शुल्क रद्द केले नाही. तर दिल्लीतील वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या घरात कांदा नेऊन फेकणार असल्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. बुलडाण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना इशारा दिला आहे.

दरम्यान, कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. या निर्णयाविरोधात आजपासून म्हणजेच सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये कांद्याचा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यातील सर्व बाजार समितीच्या सर्व घटकांनी बंद पाळावा, असे आवाहन बाजार समितीचे संचालक आणि उत्पादकांकडून केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT