Mumbai Dam Water Level Status: मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला! धरणामधील पाणीसाठ्यात मोठी वाढ; पाणीकपात रद्द

Mumbai Lake Levels Today: विहार धरण १०० टक्के भरलं आहे. तसेच अन्य ४ धरणं ९५ टक्क्यांहून जास्त भरली आहे.
Mumbai Dam Water Level Status
Mumbai Dam Water Level StatusSaam TV

Mumbai Dam Status:

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या ६ धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विहार धरण १०० टक्के भरलं आहे. तसेच अन्य ४ धरणं ९५ टक्क्यांहून जास्त भरली आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात देखील मुंबईकरांची पाणीकपातीचा चिंता मिटली आहे.

जुलैमहिन्यात मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. धो धो बरसलेल्या पावसाने मुंबईतील धरणांची पाणीपातळी काही प्रमाणात वाढली. मात्र ऑगस्टच्या पहिल्या दोन आठड्यांमध्ये पावसाने दडी मारली त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशात आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने मुंबईतील सर्व धरणांची पाणीपातळी वाढली आहे.

Mumbai Dam Water Level Status
Water Level In Mumbai Lakes: मुंबईकरांची पाण्याची चिंता जवळपास मिटली, सातही जलाशयातील पाणीसाठा ८३.१७ टक्क्यांवर

धरणांमधील पाणीसाठा

अप्पर वैतरणा - 227047 दशलक्ष लिटर

मोडकसागर - 128925 दशलक्ष लिटर

तानसा - 143769 दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा - 186297 दशलक्ष लिटर

भातसा - 562691 दशलक्ष लिटर

विहार - 27698 दशलक्ष लिटर

तुळशी - 8046 दशलक्ष लिटर

अप्पर वैतरणा धरण 71.92 टक्क्यांनी भरलं आहे. मोडकसागर 94.20 टक्के, तानसा 98.12 टक्के, मध्य वैतरणा 96.26 टक्के, भातसा 78.47 टक्के, विहार 100 टक्के, तुळशी 98.12 टक्क्यांनी भरलं आहे.

Mumbai Dam Water Level Status
Mumbai Dams water Level : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांत ८० टक्के जलसाठा, तरीही पाणीकपात कायम, कारण...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com