Alibag Nagaon School Closed Today Saam Tv
महाराष्ट्र

Alibag Leopard : अलिबागमध्ये बिबट्याची दहशत! ५ जणांवर दिवसाढवळ्या हल्ला, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

Alibag Nagaon School Closed Today : अलिबागच्या नागाव गावात दिवसाढवळ्या बिबट्याचा मुक्त वावर असून ५ जणांवर हल्ला झाला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव गावातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Alisha Khedekar

  • अलिबागच्या नागाव गावात बिबट्याचा मुक्त वावर

  • ५ जणांवर हल्ला; सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी हलवले

  • सुरक्षेच्या कारणास्तव गावातील शाळा बंद

  • वनविभाग व रेस्क्यू टीमची सतत गस्त आणि सर्च ऑपरेशन सुरू

महाराष्ट्रभर सध्या बिबट्याच्या चर्चांना उधाण आई आहे. ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. त्या संदर्भातील नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच बिबट्याच्या दहशतीने गावातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अलिबाग येथे प्रसिद्ध पर्यटनासाठी असलेले नागाव गाव हे सध्या बिबट्याच्या दहशती खाली आहे. या गावात बिबट्याचा दिवसाढवळ्या सुद्धा वावर असल्याने शाळांना सुरक्षिततेच्या कारणास्तव सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.

अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात काल दुपारी नागरिकांना बिबट्याचं अचानक दर्शन झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. हा बिबट्या गावातील वाड्यांमध्ये मुक्तपणे फिरताना दिसला. त्याने काल दुपारच्या सुमारास तब्बल ५ जणांवर हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये प्रसाद सुतार, कुणाल साळुंखे, अमित वर्तक, मंदार गडकरी आणि भाऊसाहेब जवरे (सहायक वनसंरक्षक – रेस्क्यू टीम) यांचा समावेश आहे.

हल्ल्यातील जखमींना तातडीने रायगड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनांमुळे नागरिक आणि गावकरी मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले आहेत. बिबट्याचा मुक्त वावर पाहता गावातील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. बिबट्याचा शिरकाव आणि हालचालींची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

रेस्क्यू टीमने बिबट्याच्या हालचालींची माहिती पडताळून पाहिली असून, टीम सतत गस्त घालत आहे. प्राण्याला सुरक्षितपणे पकडून जंगलात स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती रेस्क्यू टीमनी दिली. दरम्यान २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत अलिबाग पर्यटकांनी अधिक फुलतं. मात्र बिबट्याच्या या मुक्त वावराने पर्यटनावर परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्री गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाला धक्का, उमेदवारी अर्ज बाद, नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope: प्रेमात येईल यश, वैवाहिक जीवनात आनंदाची बहार; जाणून घ्या नव्या वर्षाचा पहिल्या दिवस कसा असेल तुमच्यासाठी

Maharashtra Live News Update: धनंजय मुंडेंना मोठा दिलासा करुणा शर्मा मुंडे यांची याचिका परळीच्या न्यायालयाने फेटाळली

Pune election : पुण्यात मनसे लढवणार ४४ जागा; उमेदवारांची नावे आली समोर, वाचा यादी

Thursday Horoscope: विद्यार्थ्यांसाठी सुगीचे दिवस; उद्योग धंद्यातही वाढ, वर्षाचा पहिला दिवस या ४ राशींसाठी ठरणार खास

SCROLL FOR NEXT