Yavatmal Saam
महाराष्ट्र

प्रेमाचा शेवट सैराट! विवाहितेसोबत अनैतिक संबंध, कुटुंबाला आला राग; दोघांना जंगलात नेलं अन् रात्रीच..

Married Womans Lover killed by Family Members in Yavatmal: प्रेमसंबंधांचा भीषण शेवट. विवाहित महिलेच्या प्रेमात पडल्यामुळे प्रियकराची हत्या, यवतमाळमध्ये दोघांचा निर्घृण खून. परिसरात खळबळ.

Bhagyashree Kamble

प्रेम कधी कसं होईल सांगता येत नाही. प्रेमाचा शेवट कधी चांगला तर, कधी भयानक होतो. असंच एका प्रेमाचा शेवट भयानक झाला आहे. विवाहित महिलेच्या प्रेमात पडल्यामुळे आपल्याच लोकांनी प्रियकराची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना यवतमाळमधील एका गावात घडली आहे. प्रेमसंबंधामुळे समाजात बदनामी होईल या भीतीपोटी सख्खा भाऊ, जावई, मामा तसेच इतर काही लोकांनी मिळून दोघांची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आकाश बल्लाळ आणि वर्षा गिरे हे जोडपं यवतमाळच्या दिग्रस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ईसापूर परिसरातील रहिवासी होते. वर्षा गिरे या महिलेचं लग्न झालं होतं. आकाश आणि वर्षा यांची भेट घडली. नंतर दोघांमध्ये प्रेम फुलत गेलं. २८ मार्चला वर्षा नवरा आणि मुलांना सोडून वाशिमहून पुण्याला आकाशकडे गेली. या प्रेमसंबंधाला मात्र आकाशच्या कुटुंबाचा विरोध होता. या प्रकरणामुळे बदनामी होईल या भीतीपोटी कुटुंबातील चौघांनी त्याचा संपवण्याचा कट रचला.

कपल पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर विकासचा चुलत भाऊ सज्जन बल्लाळ, जावई विजय शिखरे आणि मामा विशाल शिखरे यांनी पुण्यातून दोघांना परत आणले. त्या दोघांना ३ एप्रिलला पुसद येथील लॉजवर थांबवले. विजयने त्याच्या दोन मित्रांना बोलावून घेतलं.

रात्री साडेआकराच्या दरम्यान विठाळा जंगलात आकाश आणि वर्षाला नेलं. त्यानंतर दोघांची हत्या केली. विजयने नंतर दोघांचे मृतदेह मालवाहू वाहनात टाकून दिग्रस शहरालगतच्या जंगलात फेकून दिलं. नंतर मृतकाचे कागदपत्रे आणि सामान जाळून टाकले. त्यानंतर आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तपास केला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT