औरंगाबाद - शहरातील महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात वर्षभरापासून मेटिंग बंद असल्यानं वाघांचा (Tiger) पाळणा लांबला आहे. लोकसंख्या, कौटुंबिक अडचणी, आर्थिक समस्या, शिक्षण, करिअर अशा अनेक कारणासोबतच हम दो, हमारे दो किंवा हम दो हमारा एक ही कन्सेप्ट रूढ झाल्याने अलीकडच्या काळात गर्भ न ठेवणे किंवा लांबवणे, हे अनेक कुटुंबात दिसून येते. एकाद्या स्त्री-पुरुष जोडप्याला काही काळ मुलं नको आहे, तर ते वेगवेगळ्या साधनांच्या मदतीने उपाययोजना करीत असतात. असे जर प्राण्याबद्दल ऐकले तर तुम्हाला नवल वाटेल पण ते खरं आहे. (Family planning of tigers in Aurangabad)
हे देखील पहा -
औरंगाबादमध्ये (Aurangabad) चक्क वाघांचं कुटुंबनियोजन आणि पाळणा लांबविण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात (Zoo) अपुरी जागा असल्यामुळे वाघ वाघिणीच्या सहजीवनावर आणि एकत्र येण्यावर बंधनं आणली आहेत. पाळणा लांबवण्यासाठी एक वर्षांपासून त्यांना वेगवेगळे ठेवले जात आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयामध्ये एकूण १२ वाघ आहेत. त्यात ७ मादी आणि २ नर असे ९ पिवळ्या रंगाचे वाघ आहेत. तर २ नर आणि १ मादी असे तीन पांढरे वाघ आहेत.
त्यात मागच्या वर्षी वाघांची संख्या वाढली असल्यामुळे वर्षभरापूर्वी एक वाघाची जोडी पुण्याला देण्यात आली होती. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील सर्वाधिक चर्चेत असलेली समृद्धी या वाघीनीने मागील वर्षी पाच बछड्यांना जन्म दिला. औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाची जागा अपुरी पडत असल्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने जागा नसल्यामुळे वाघ आणि वाघीण यांचा सहवास रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वर्षभरापासून नर आणि मादी वाघांना वेगवेगळे ठेवण्यात येत आहे.
औरंगाबाद हे पिवळ्या वाघाच्या प्रजननासाठी पोषक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. कारण देशातील कोणत्याही प्राणीसंग्रहालयात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रजनन दर नाही. मागील तीस वर्षांचा इतिहास पाहता, औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात साठपेक्षा अधिक वाघांचा जन्म झाला आहे. त्यामुळे ही संख्या सतत वाढत आहे, मात्र प्राणीसंग्रहालयाची जागा अपुरी पडत असल्यामुळे वाघांचं सुद्धा कुटुंबनियोजन करण्याची वेळ आली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.