Dhule Police seize ₹22,200 in fake ₹100 and ₹500 notes; one suspect arrested amid upcoming local elections. Saam Tv
महाराष्ट्र

धुळ्यात बनावट नोटांसह एक जेरबंद; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ

Fake Currency Seized In Dhule Ahead: धुळे तालुका पोलिसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटांसह एका संशयिताला जेरबंद केले आहे.

Omkar Sonawane

  • धुळे तालुका पोलिसांनी १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह एका संशयिताला जेरबंद केले.

  • पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली

  • आरोपी हा विदर्भातील असल्याचे उघडकीस आले असून, मोठे बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता तपासात व्यक्त.

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्याने प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

धुळ्यात शंभर व पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह एका संशयिताच्या धुळे तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या बनावट नोटांच्या कारवाईमुळे धुळे शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे,

धुळे तालुका पोलिसांना बनावट नोटा आपल्या सोबत बाळगून असल्याचे खात्रीला सूत्रांतर्फे माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी सापळा रचून सदर संशयीताला ताब्यात घेतले असता त्याकडे १०० आणि ५०० च्या बनावट नोटा मिळून एकूण २२,२०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.

संशयित आरोपी हा विदर्भातील असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले असल्याने मोठे रॅकेट यामागे सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या कारवाईमुळे धुळे शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही घटना उघड झाल्याने प्रशासनही सतर्क झालं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

निवडणुकी दरम्यान मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर सर्हासपणे केला जातो. मतदान होण्याच्या दोन दिवसांपासून नोटांच्या बॅगा भरून मतदारसंघात दिले जातात. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी देखील असे अनेक प्रकरण समोर आली होती. त्यानंतर देखील बनावट नोटा छापा प्रकरणाचे प्रकरण समोर आले. पुढील वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. तत्पूर्वी राज्यात अनेक शहरांमध्ये नोटा छापण्याचे प्रकार समोर येत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT