Flood Relief Help Scam : अकोल्यात शेतकऱ्यांची थट्टा! मदत म्हणून ३ ते २१ रुपयांचा चेक, ‘साम टीव्ही’च्या बातमीनंतर सरकारला जाग

Akola Farmers News : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या तुटपुंजी मदतीचे फक्त ३ रुपये, ५रुपये ,८रुपये , २१ रूपयांचे धनादेश देण्यात आले. ‘साम टीव्ही’च्या बातमीनंतर प्रशासन आणि सरकार हादरले आहे.
Flood Relief Help Scam : अकोल्यात शेतकऱ्यांची थट्टा! मदत म्हणून ३ ते २१ रुपयांचा चेक, ‘साम टीव्ही’च्या बातमीनंतर सरकारला जाग
Akola Farmers NewsSaam tv
Published On
Summary

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीनंतर फक्त ३ ते २१ रुपयांचे मदतीचे धनादेश देण्यात आले

शेतकऱ्यांनी ही मदत अपमानास्पद असल्याचं सांगत धनादेश परत केले

‘साम टीव्ही’ने बातमी उचलल्यावर सरकार आणि प्रशासन जागे झाले

काँग्रेसने प्रशासनावर टीका करत शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवला

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या तूटपंजी मदत खात्यावर जमा झाली आहे. दिनोडा, नरोडा, कावसा येथील शेतकऱ्यांच्या माथी फक्त ३ रुपये, ५रुपये ,८रुपये , २१ रूपयांचे मदतीचे धनादेश मारण्यात आले आहेत. 'साम टीव्हीने' हा विषय उचलून धरल्यानंतर सरकार आणि प्रशासन हादरलं आहे. यावरून आता सारवासारव करणाऱ्या जिल्हा प्रशासनानं कुणालाच हजाराच्या खाली पैसे मिळाले नसल्याचा दावा केला आहे. अत्यल्प मदत मिळालेल्या मातीतील एका टप्प्याचे असल्याचं अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

अतिवृष्टीच्या 'अस्मानी' संकटात सापडलेला अकोला जिल्ह्यातील शेतकरी आता सरकारी व्यवस्थेच्या संवेदनाशुन्य 'सुल्तानी' संकटात सापडला आहे . यातूनच अकोला जिल्ह्यातील दिनोडा गावातील शेतकऱ्यांना फक्त ३ रुपये, ५रुपये ,८रुपये , २१ रूपयांचे मदतीचे धनादेश देण्यात आले. अशीच परिस्थिती लगतच्या कावसा, मरोडा आणि इतर गावातील शेतकऱ्यांबाबत झाली आहे. सरकार आणि प्रशासनानं यातून आपली थट्टा केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. ही मदत तुटपुंजी व अपमानास्पद असल्याचं सांगत दोन दिवसांपूर्वी हे धनादेश या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परत केले होते.

Flood Relief Help Scam : अकोल्यात शेतकऱ्यांची थट्टा! मदत म्हणून ३ ते २१ रुपयांचा चेक, ‘साम टीव्ही’च्या बातमीनंतर सरकारला जाग
Operation Cy-Hunt : 'ऑपरेशन साय-हंट'! एकाच दिवशी २६३ गुन्हेगारांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

'साम टीव्ही'ने या विषयावर आवाज उठवल्यानंतर सरकार आणि त्यांची कुंभकर्णी झोपेत असलेली यंत्रणा जागी झाली आहे. मग सुरू झाला बातम्यांना खोटं ठरवण्यासाठीचा आटापिटा. यात सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर कमी रकमेचा धनादेश मिळालेल्या संदीप घुगे या शेतकऱ्यांने विम्यासाठी नोंदणी न केल्याची खोटी बातमी दिली आहे. अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मिना यांनी असं काही झालं नसल्याचा दावा करीत प्रशासनाची चुक झाकण्याचा प्रयत्न केला.

Flood Relief Help Scam : अकोल्यात शेतकऱ्यांची थट्टा! मदत म्हणून ३ ते २१ रुपयांचा चेक, ‘साम टीव्ही’च्या बातमीनंतर सरकारला जाग
Samruddhi Expressway Bus Fire : समृद्धी महामार्गावर थरार! १२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट, नेमकं काय घडलं?

अतिवृष्टीने लाखोंचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपण किमान १००४ रूपयांची मदत केल्याचा दावा जिल्हा प्रशासनानं केला आहे. हा दावा अत्यंत असंवेदनशीलपणाचा आहे. काँग्रेसने या एकंदरीत या सर्व प्रकारावर जोरदार टीका केली आहे. सरकार आणि त्यांचं प्रशासन हे कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानतं आहे. लाखोंचं नुकसान होऊन शेतकऱ्यांना एक आकडी, दोन आकडी मदतीचे धनादेश देणारी यंत्रणा ही अत्यंत निर्ढावलेली अन तेव्हढीच असंवेदनशील म्हणावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com