Raj Thackeray  In Satyacha Morcha
Raj Thackeray shows piles of proof during Satyacha Morcha in Mumbai, targeting Election Commission over voter list irregularities.saam tv

Satyacha Morcha: सत्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरेंनी दाखवला पुराव्याचा ढिगारा; विरोधकांचा आयोगावर हल्लाबोल, जाणून घ्या कोण काय म्हणाले?

Raj Thackeray In Satyacha Morcha : राज ठाकरे यांनी मुंबईतील 'सत्याचा मोर्चा'मध्ये दुबार मतदाराचा पुरवा दाखवला. तसेच निवडणूक आयोगावर निष्क्रियतेचा आरोप केला.
Published on
Summary
  • सत्याच्या मोर्चात निवडणूक आयोगाला पुरावे दाखवण्यात आले आहे.

  • मतचोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर आणि आयोगावर टीका

  • मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी

आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. शरद पवार, कम्युनिस्ट पक्ष,उद्धव ठाकरे मी सर्व बोलतोय इतकेच नाही तर भाजपाच्या नेत्यांसह शिंदे, अजित पवारही दुबार मतदाराबाबत बोलत आहेत, तरी मतदार याद्या साफ होत नाहीत. मतदार याद्या साफ करण्यास आणि दुरुस्त करण्यास कोणी अडवलं असं म्हणत राज ठाकरे सत्याचा मोर्चामध्ये पुराव्याच्या ढिगारा दाखवला.

मतचोरी होते, दुबार मतदार आहेत, एकाच पत्त्यावर अनेक नावे आहेत,त्यामुळे मतदार याद्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी विरोधकांकडून केली आहे. मात्र निवडणूक आयोग विरोधकांना याचा पुरावा द्या असं सांगत आहे. त्यावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी पुराव्याच्या ढिगारा दाखवत आयोगाला सुनावलं

Raj Thackeray  In Satyacha Morcha
संजय काका, काळजी घे! आदित्य ठाकरेंची संजय राऊतांसाठी खास भावूक पोस्ट; नेमकं काय लिहिलं?

कल्याण-डोंबिवली यासह या भागातील साडेचार हजार लोकांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केले. त्यांनी तिथेही मतदान केले आणि इथेही मतदान केले. राज्यभरात लाखो मतदार असे आहेत, ज्यांनी अशा प्रकारे मतदार आहेत आणि मतदान केले. ठाणे मतदारसंघात २ लाख ९ हजार ८१ दुबार मतदार असल्याचं सांगत राज ठाकरेंनी याचा पुरावा दाखवला. २०१७ पासून आपण याबाबत बोलत असल्याचंही राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray  In Satyacha Morcha
Satyacha Morcha Live : 'सत्याचा मोर्चा आयोगाविरोधात, मग सरकार का नाचतेय? अविनाश जाधवांचा भाजपवर थेट हल्लाबोल

तहसीलदारांना अधिकार नाहीत- बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात यांनीही बोगस मतदारावरून बोलताना आपल्या मतदारसंघचे उदाहरण दिलं. आपल्या मतदारसंघात साडेनऊ हजार मतदार बोगस असल्याचं दाखवून दिले. परंतु तहसीलदार म्हणाले की, आम्हाला अधिकार नाही. लेखी उत्तर दिलंय. आम्ही दोन्ही निवडणूक आयोगाला भेटलो, सर्वांना निमंत्रित करण्यात आले होते. लोकशाही मानतात, त्यांना बोलावले होते. आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले, पण एकाही मुद्द्यावर निवडणूक आयोगाला उत्तर देता आले नसल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.

मतचोरी मुख्यमंत्र्यांनीही मान्य केली- उद्धव ठाकरे

माझ्या जागरूक देशभक्त आणि खऱ्या मतदार बांधवांनो आणि भगिनींनो. संयुक्त महाराष्ट्रानंतर अशा प्रकारे पक्षांची एकजूट आज झाली. ही फक्त ठिणगी आहे. याची आग कधी लागेल, तुम्हाला कळणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर घणाघात चढवला. राज ठाकरे यांनी पुरावेच दिलेत,इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांनीह मतचोरी होत असल्याचं मान्य केल्याच उद्धव ठाकरे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com